ETV Bharat / bharat

रवीश कुमार यांना २०१९ चा 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार जाहीर; पाहा व्हिडीओ - 'रॅमन मॅगसेसे

एनडीटीव्ही वाहिनीचे संपादक रवीश कुमार यांना आशिया खंडाचा 'नोबेल' म्हणजेच २०१९ चा 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार जाहीर झाला आहे.

रवीश कुमार यांना २०१९ चा 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार जाहीर; पाहा व्हिडीओ
author img

By

Published : Aug 3, 2019, 11:43 PM IST

नवी दिल्ली - एनडीटीव्ही वाहिनीचे संपादक रवीश कुमार यांना आशिया खंडाचा 'नोबेल' म्हणजेच २०१९ चा 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार जाहीर झाला आहे. हिंदी भाषिक वाहिनीमध्ये पत्रकारितेसाठी त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे.

रवीश कुमार यांना २०१९ चा 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार जाहीर

रवीश कुमार यांची मुख्य भूमिका असलेले 'प्राईम टाईम' आणि 'आम लोगों की वास्तविक' कार्यक्रमाचे कौतुक संस्थेने केले आहे. रवीश कुमार यांच्या व्यतिरिक्त स्वे वि (म्यानमार), अंगखाना नीलापजीत (थायलंड), रेमुंडो पुजांते कैयाब (फिलीपिन्स) आणि किम जोंग कि (दक्षिण कोरिया) यांना २०१९ चा रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.

रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळणारे रवीश कुमार भारताचे सहावे पत्रकार आहेत. याआधी अमिताभ चौधरी (१९६१), बीजी वर्गीज (१९७५), अरुण शौरी (१९८२), आर. के लक्ष्मण (१९८४) आणि पी. साईनाथ (२००७) यांना पुरस्कार मिळाला आहे.

एप्रिल 1957 मध्ये न्यूयॉर्क मधील रॉकफेलर ब्रदर्स फंडच्या ट्रस्टींनी फिलिपाइन्स सरकारसोबत रॅमन मॅगसेसे पुरस्काराला सुरुवात केली.फिलिपाइन्सचे माजी अध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो.रॅमन डेल फिएर्रो मॅगसेसे एक फिलिपिनो राजकारणी होते.

Intro:Body:

national

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.