ETV Bharat / bharat

जी-20 डिजिटल मंत्र्यांच्या शिखर परिषदेला रविशंकर प्रसाद संबोधित करणार - जी - 20 शिखर परिषद

केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद आज जी -20 सदस्य देशांच्या मंत्र्यांच्या बैठकीला संबोधित करतील.

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद

author img

By

Published : Jul 22, 2020, 11:59 AM IST

नवी दिल्ली - केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद आज जी -20 सदस्य देशांच्या मंत्र्यांच्या बैठकीला संबोधित करतील. सायंकाळी साडेपाच वाजता ते भाषण करतील. सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली जी 20 परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या पंधराव्या परिषदेसाठी '21 व्या शतकातील संधींची जाणीव' या थीमची निवड केली आहे.

जी - 20 शिखर परिषद 2020 चे अध्यक्ष सौदी अरेबियाचे सुलतान सलमान बिन अब्दुल अझिज अल सऊद आहेत. जी -20 शिखर परिषद 2020, 21 ते 22 नोव्हेंबरला 2020 रोजी सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे होणार आहे.

दरम्यान जी-20 देशांची परिषद 2022 मध्ये भारतात होणार आहे. 2022 मधील जी 20 परिषदेचे यजमानपद इटली भूषवणार होता, पण भारताच्या विनंतीनुसार त्यांनी या परिषदेचे यजमानपद भारताला देण्यात आले आहे.

जी-20 जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचा समूह आहे, ज्यात अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, चीन, युरोपीय संघ, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, ब्रिटन आणि अमेरिका यांचा यामध्ये समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.