ETV Bharat / bharat

'या' कारणामुळे देवनगरी देवघरमध्ये रावणदहन केले जात नाही... - रावणदहन देवघर बातमी

देवघर जिल्ह्यात विजयादशमीच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जात नाही. देवनगरी ही रावणाची तपोभूमी मानली जाते. येथे स्थापित केलेल्या पवित्र द्वादश ज्योतिर्लिंगाला रावणेश्वर बाबा बैद्यनाथच्या नावाने ओळखले जाते.

देवघर
देवघर
author img

By

Published : Oct 26, 2020, 2:59 PM IST

देवघर (झारखंड) : अन्यायावर न्यायाचा विजय, असा हा दसरा सण देशभरात साजरा केला जातो. या प्रसंगी लोकं वाईट गोष्टींचं दहन म्हणून प्रतिकात्मक पुतळा जाळून आनंदोत्सव साजरा केला जातो. एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. मात्र, देवनगरी देवघरमध्ये विजयादशमीला रावणदहन केले जात नाही.

देवनगरी देवघरमध्ये रावणदहन केले जात नाही

रावणमुळे येथे स्थापित झाले बाबा बैद्यनाथ -

जाणकारांच्या अनुसार रावण हा महादेवाचा परमभक्त होता. रावणाने आणलेल्या द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंगाची स्थापना भगवान विष्णूद्वारे करण्यात आली. ज्यामुळे देवनगरीला देशभरात महत्व प्राप्त झाले. देवनगरी ही रावणाची तपोभूमी मानली जाते. येथे स्थापित केलेल्या पवित्र द्वादश ज्योतिर्लिंगाला रावणेश्वर बाबा बैद्यनाथच्या नावाने ओळखले जाते.

रावणाची ओळख दोन रुपांत केली जात असल्याचे जाणकार सांगतात. पहिले म्हणजे, दशानन रावण आणि दुसरं म्हणजे वेद-पुराणातील प्रकांडपंडित आणि विद्वान रावण अशी ही दोन रुपे आहेत. रावणामुळेच देवनगरी ही पुण्यभूमीत रुपांतरित होऊ शकली, त्यामुळेच येथे रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जात नाही.

बाबा बैद्यनाथ धाम - मान्येतनुसार देवघरमध्ये रावणामुळे द्वादश ज्योतिर्लिंग बाबा बैद्यनाथ यांना विष्णूंनी स्थापन केले होते. बाबा बैद्यनाथ यांना कामनासिंह असेही म्हणतात. त्यामुळे, रावणेश्वर बाबा बैद्यनाथच्या या भूमीत दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जात नाही.

हेही वाचा - कोळसा घोटाळा : माजी केंद्रीय मंत्री दिलीप रे यांना जामीन मंजूर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.