रांची - झारखंड राज्यातील रांची येथून सहा नक्षलवाद्यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक करण्यात आली आहे. पिपल्स लिबरेशन फ्रन्ट ऑफ इंडिया (पीएलएफआय) संघटनेचे हे सदस्य असल्याची माहिती आहे.
काही सक्रिय पीएलएफआय सदस्य नामकुम येथे जमले असून एका व्यावसायिकावर हल्ला करण्याची योजना आखत असल्याची माहिती एसएसपी सुरेंद्र कुमार झा यांना मिळाली होती. माहितीच्या आधारावर त्यांनी पथकासह छापे टाकले.
पोलीस पथकाने सहा नक्षलवाद्यांना ताब्यात घेतले असून अद्याप त्यांची ओळख पटली नाही. या नक्षलवाद्यांचा संबंध पीएलएफआय सुप्रीमो दिनेश गोपे यांच्याशी असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांकडून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त केली आहेत.