नवी दिल्ली - दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल ३ डिसेंबरपासून उपोषणाला बसल्या आहेत. बलात्काऱ्यांना सहा महिन्यांच्या आत फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी त्यांना केली आहे. आज (गुरुवार) त्यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे. मालिवाल यांच्या आंदोलनाचा मुद्दा आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी राज्यसभेत उठवला.
हेही वाचा - Breaking News : अयोध्या निकालाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
राज्यसभेत शून्य प्रहर काळात सिंह यांनी मालिवाल यांच्या उपोषणाचा मुद्दा उठवला. मालिवाल यांच्या मागण्या न्याय असून सरकारने लक्ष्य घालण्याची मागणी सिंह यांनी केली. निर्भया हत्याकांडातील आरोपींना तत्काळ फाशीची देण्यात यावी, अशी मागणी मालिवाल यांनी केली आहे. दहा दिवसांच्या उपोषणामुळे मालिवाल यांची प्रकृती ढासळली आहे.
हेही वाचा - नागरिकत्व दुरुस्ती विधेयक: ईशान्य भारतातील आंदोलन चिघळलं, भाजप मुख्यालयावर हल्ला
दिल्लीमध्ये पोलिसांची ६६ हजार पदे रिक्त आहेत. त्यासोबतच संपूर्ण देशात पोलिसांच्या जागा रिक्त आहेत, त्या लवकरात लवकर भराव्यात. बलात्कार प्रकरणातील खटल्यांची सुनावणी जलद होण्यासाठी देशभरामध्ये 'फास्ट ट्रॅक' न्यायालयांची स्थापना करण्यात यावी. निर्भया फंड महिलांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात यावा. सॉफ्टवेअर बनवून बलात्कार खटल्याची प्रगती त्यावर टाकण्यात यावी. त्याद्वारे पोलिसांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशा मागण्या त्यांनी राज्यसभेत केल्या.