ETV Bharat / bharat

राजनाथ सिंह यांची 'शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन'च्या बैठकीला हजेरी - SCO meet

एससीओ बैठकीला हजेरी लावण्यासाठी राजनाथ सिंह रशियाला गेले आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा तिसरा दिवस आहे. संरक्षण मंत्र्यांच्या प्रवक्त्याने ट्विटद्वारे राजनाथ सिंह यांच्या दौऱ्याची माहिती दिली. रशियाच्या अधिकाऱ्यांसोबतचे फोटो संरक्षण मंत्रालयाने शेअर केले आहेत.

Defence Minister Rajnath Singh
राजनाथ सिंह
author img

By

Published : Sep 4, 2020, 4:42 PM IST

मास्को - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज(शुक्रवार) शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) बैठकीला हजेरी लावली. सिंह एससीओ संघटनेच्या बैठकीसाठी रशियाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी रशियन लष्करासाठी नव्याने बांधण्यास आलेल्या कॅथेड्रल चर्चला आणि म्युझियमला भेट दिली. सिंह यांच्यासोबत भारतीय प्रतिनिधी मंडळ असून चीन वादाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्र्यांनी बैठकीत सहभाग घेतला आहे. आज सायंकाळी सिंह चीनच्या संरक्षण मंत्र्यांना भेटण्याची शक्यता आहे.

एससीओ बैठकीला हजेरी लावण्यासाठी राजनाथ सिंह रशियाला गेले आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा तिसरा दिवस आहे. संरक्षण मंत्र्यांच्या प्रवक्त्याने ट्विटद्वारे राजनाथ सिंह यांच्या दौऱ्याची माहिती दिली. रशियन अधिकाऱ्यांसोबतचे फोटो संरक्षण मंत्रालयाने शेअर केले आहेत.

गुरुवारी रशियाच्या संरक्षण मंत्र्याशी बैठक झाल्याची माहिती सिंह यांनी दिली होती. देशाच्या सुरक्षेसाठी रशियाने केलेल्या सहकार्याचे सिंह यांनी कौतुक केले. तसेच भारत रशिया करारानुसार लष्करी सामुग्री जलद भारताला देण्याच्या मुद्द्यावर त्यांनी जोर दिला. एके ४७ २०३ या बंदुका बनविण्यासाटी रशिया आणि भारतात नुकताच करार झाला आहे.

एससीओ संघटनेत भारत, कझाकिस्तान, चीन, किरगिझिस्तान, पाकिस्तान, रशिया, तझाकिस्तान आणि उझबेकिस्तानचा समावेश आहे. संरक्षण मंत्री स्तरावर ही बैठक होत असते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.