ETV Bharat / bharat

'लडाखमधील सैनिकांचे मनोबल वाढविल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे धन्यवाद'

पंतप्रधान मोदींनी आज लडाखला अचानक भेट देऊन लष्कराच्या तयारीचा आढावा घेतला. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना परिस्थितीची माहिती दिली. सीमेवरील (फॉर्वर्ड पोस्ट) निमू चौकीला मोदींनी भेट दिली. मोदींच्या या भेटीचे संरक्षण मंत्र्यांनी कौतुक केले.

राजनाथ सिंह
राजनाथ सिंह
author img

By

Published : Jul 3, 2020, 4:27 PM IST

नवी दिल्ली : भारत- चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज(शुक्रवार) अचानक लडाखला भेट देत सीमेवरील लष्कराच्या तयारीचा आढावा घेतला. मोदींनी दिलेल्या भेटीवरून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांचे आभार मानले आहेत. मोदींच्या भेटीमुळे सैनिकांचे मनोबल वाढल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत चीनमधील सैनिकांच्या धुमश्चक्रीत 20 भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर भारताने सीमेवर ‘हायअलर्ट’ जारी केला असून अतिरिक्त सैनिक तैनात केले आहे. लडाख समुद्र सपाटीपासून उंचावर असल्याने अतिथंड प्रदेशात मोडते. तसेच डोंगर उताराचा आणि खडकाळ भाग असल्याने सैनिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सीमेवर तणावाची परिस्थिती असतानाच मोदींनी लडाखला भेट दिली.

भारतीय लष्कराच्या निगराणीत देशाच्या सीमा कायमच सुरक्षित आहेत. पंतप्रधान मोदींच्या लडाख भेटीमुळे जवानांचे नक्कीच मनोबल वाढले. लडाखला भेट दिल्यामुळे मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो, असे ट्विट राजनाथ सिंह यांनी केले आहे.

पंतप्रधान मोदींनी आज लडाखला अचानक भेट देऊन लष्कराच्या तयारीचा आढावा घेतला. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना परिस्थितीची माहिती दिली. सीमेवरील (फॉर्वर्ड पोस्ट) निमू चौकीला मोदींनी भेट दिली. यावेळी मोदींबरोबर सरसेनाध्यक्ष बिपीन रावत आणि लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.