ETV Bharat / bharat

काँग्रेसची इच्छा असेल, तर त्यांनी पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांचे मृतदेह मोजावेत - राजनाथ सिंह - BJP

भारताने केलेल्या प्रतिहल्ल्यामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला हे आज ना उद्या समोर येणारच आहे. त्याबद्दल पुरावेही आपण प्रसिद्ध करणार, असे राजनाथ सिंह म्हणाले.

राजनाथ सिंह सैनिक तळाचे परिक्षण करताना
author img

By

Published : Mar 5, 2019, 11:30 PM IST

Updated : Mar 5, 2019, 11:53 PM IST

दिसपूर - पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात किती दहशतवादी ठार झाले, असा सवाल काँग्रेस सरकारला विचारत आहेत. यावर बोलताना, इच्छा असेल तर त्यांनी स्वतः पाकिस्तानात जावे आणि मृत दहशतवादी मोजावेत, असा खोचक सल्ला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांना दिला आहे. ते मंगळवारी आसाम येथे एका सभेला संबोधित करत होते.

भारताने केलेल्या प्रतिहल्ल्यामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला हे आज ना उद्या समोर येणारच आहे. त्याबद्दल पुरावेही आपण प्रसिद्ध करणार, असे राजनाथ सिंह म्हणाले. राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेने (एनटीआरओ)एका अहवालात घटना स्थळी ३०० मोबाईल सक्रिय होते, अशी माहिती दिली आहे. म्हणजेच तेथे जवळपास ३०० लोक होते, असा दावाही राजनाथ सिंह यांनी यावेळी केला.

Rajnath Singh
राजनाथ सिंह सैनिक तळाचे परिक्षण करताना

एनटीआरओ ही प्रमाणिक प्रणाली आहे. तेथे ३०० मोबाईल सक्रिय होते असे त्यांचे म्हणणे आहे. याचा अर्थ त्या फोनचा उपयोग झाडं करीत होते का? आता आपण एनटीआरओवरही आक्षेप घेणार का? असा सवालही राजनाथ सिंह यांनी यावेळी दागला.
सरकार बनवताना खालच्या स्तराचे राजकारण करू नये. राजकारण करायचेच असल्यास देश निर्माण करणारे राजकारण करावे. तुम्हाला मृतांचा आकडाच हवा असेल तर, पाकिस्तानात जाऊन तेथील लोकांनाच विचारा किती दहशतवादी मारण्यात आले, असेही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

Intro:Body:

KESARI SONG PKG_ASHVINI.

Conclusion:
Last Updated : Mar 5, 2019, 11:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.