ETV Bharat / bharat

दिल्ली हिंसाचार : केंद्र सरकारवर रजनीकांत भडकले, म्हणाले... - रजनीकांत

दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन झालेल्या हिंसाचारावर रजनीकांत म्हणाले, 'दिल्ली हिंसाचार हा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या गुप्तचर विभागाचे अपयश आहे. एखाद्या गोष्टीचा निषेध हा शांततेतही करता येतो. त्यासाठी हिंसा करण्याची गरज नाही आणि तरीही हिंसाचार झाल्यास तो कठोरपणे मोडून काढला पाहिजे. जर तुमच्याकडून दंगली नियंत्रणात येत नसतील तर तुम्ही सत्ता सोडायला हवी.'

Rajinikanth condemns Centre over Delhi violence, says 'resign if you can't crush it with iron fist'
दिल्ली हिंसाचार : केंद्र सरकारवर रजनीकांत भडकले, म्हणाले...
author img

By

Published : Feb 27, 2020, 1:12 AM IST

नवी दिल्ली - दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर अभिनेते रजनीकांत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीतील हिंसाचार रोखण्यामध्ये केंद्र सरकारची गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरली. जर तुमच्याकडून दंगली नियंत्रणात येत नसतील तर तुम्ही सत्ता सोडायला हवी, अशी गंभीर टीका रजनीकांत यांनी केली आहे. यासोबत रजनीकांत यांनी दिल्लीकर नागरिकांनाही संयमाचे आवाहन केले आहे.

दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन झालेल्या हिंसाचारावर रजनीकांत म्हणाले, 'दिल्ली हिंसाचार हा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या गुप्तचर विभागाचे अपयश आहे. एखाद्या गोष्टीचा निषेध हा शांततेतही करता येतो. त्यासाठी हिंसा करण्याची गरज नाही आणि तरीही हिंसाचार झाल्यास तो कठोरपणे मोडून काढला पाहिजे. जर तुमच्याकडून दंगली नियंत्रणात येत नसतील तर तुम्ही सत्ता सोडायला हवी.'

  • Rajinikanth: It is an intelligence failure and hence Home Ministry also failed. Protests can happen peacefully but not in a violent manner. If violence breaks out, it should be dealt with iron hands. #NortheastDelhi pic.twitter.com/idRpHOtCEU

    — ANI (@ANI) February 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हे बोलताना मात्र, रजनीकांत यांनी कोणाचेही प्रत्यक्ष नाव घेतले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याविषयी रजनीकांत म्हणाले, 'जेव्हा ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा केंद्राने सावधानता बाळगण्याची गरज होती. गुप्तचर विभागाने आपले काम नीट केले नाही. यामुळे हिंसा भडकली.'

विरोध प्रदर्शन करणाऱ्यांनी हिंसक होण्याची आवश्यकता नाही. जर सीएएने खरेच मुस्लिमांचे नुकसान होणार असल्यास मी त्यांच्यासोबत असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

दरम्यान दिल्लीतील आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने, जाफराबाद, मौजपूर, चांद बाग, कारावाल नगर येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच दंगेखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत. या हिंसारातील मृतांचा आकडा 27 हून अधिक झाला आहे. तर 200 हून अधिक जण जखमी आहेत.

हेही वाचा - 'दिल्ली हिंसाचाराने गुजरात दंगलीची आठवण करुन दिली'

हेही वाचा - दिल्ली हिंसा : पोलिसांकडून हेल्पलाईन क्रमांक जारी , 106 जणांना अटक तर 18 जणांवर एफआयआर दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.