नवी दिल्ली - सौदर्यंस्पर्धेत प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या मिस इंडिया स्पर्धेचा शनिवारी रात्री निकाल जाहीर झाला. यामध्ये राजस्थानच्या सुमन रावने 'मिस इंडिया २०१९ चा किताब पटकाविला आहे.
सुमन रावने यापूर्वी सीएच्या परीक्षेची तयारी केली आहे. मिस इंडिया स्पर्धेत छत्तीसगडची शिवानी जाधव हिचा स्पर्धेत दुसऱ्या क्रमांक आला. ती 'मिस ग्रँड २०१९' ची विजेती ठरली आहे. तिसऱ्या क्रमांकावर आलेली बिहारची श्रेया शंकर हिची 'मिस इंडिया युनायटेडे कंटिटेन्टस २०१९' म्हणून निवड झाली आहे. तर तेलंगणाची संजना विज ही मिस इंडिया २०१९ ची उत्तेजनार्थ (रनर अप) ठरली आहे. मिस इंडिया स्पर्धेत सौदर्याबरोबरच बुद्धिमत्तेचा निकषही असतो. त्यासाठी स्पर्धेत परीक्षकाकडून प्रश्न विचारले जात असतात.