ETV Bharat / bharat

राजस्थानात जोरदार पावसामुळे मंडप कोसळून २१ जणांचा मृत्यू, ५४ जखमी - storm

या मंडपामध्ये श्री राम कथा कार्यक्रम सुरू होता. यादरम्यान, जोरदार वारा आणि पावसामुळे पंडाल कोसळल्याने ही दुर्घटना घडली.

पंडाल कोसळून १४ जणांचा मृत्यू
author img

By

Published : Jun 23, 2019, 5:57 PM IST

Updated : Jun 24, 2019, 8:16 AM IST

बाडमेर - जिल्ह्यातील जसोल या गावात येथे जोरदार वारा आणि पावसामुळे रामकथा मंडप कोसळून २१ जणांचा मृत्यू झाला. तर, ५० हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. अद्याप बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

मंडप कोसळून १४ जणांचा मृत्यू

या मंडपामध्ये श्री राम कथा कार्यक्रम सुरू होता. यादरम्यान, जोरदार वारा आणि पावसामुळे मंडप कोसळल्याने ही दुर्घटना घडली. त्याचवेळी विद्यूत तार तुटल्याने मंडपामध्ये वीजप्रवाह पसरला. विजेच्या धक्क्याने अनेकांचा मृत्यू झाला. तसेच, गुदमरल्यानेही काही जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये वृद्धांची संख्या अधिक आहे. जखमींना नाहटा येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. पोलीस आणि प्रशासकीय कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.

या घटनेवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच, बचावकार्यासाठी शक्य ती सर्व मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे. तसेच, जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

  • जसोल,बाड़मेर में राम कथा के दौरान टेंट गिरने से हुए हादसे में बड़ी संख्या में लोगों की जान जाने की जानकारी अत्यंत दुखद, दुर्भाग्यपूर्ण है।ईश्वर से दिवंगतों की आत्मा को शांति प्रदान करने,शोकाकुल परिजनों को सम्बल देने की प्रार्थना है। घायलों के शीघ्र स्वास्थ्य लाभ की कामना करता हूँ

    — Ashok Gehlot (@ashokgehlot51) June 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • स्थानीय प्रशासन द्वारा राहत एवं बचाव का कार्य किया जा रहा है।
    सम्बंधित अधिकारियों को हादसे की जांच करने, घायलों का शीघ्र उपचार सुनिश्चित करने तथा प्रभावितों एवं उनके परिजनों को हरसंभव सहायता उपलब्ध कराने के निर्देश दिए हैं। #Barmer #Rajasthan

  • Collapse of a ‘Pandaal’ in Rajasthan’s Barmer is unfortunate. My thoughts are with the bereaved families and I wish the injured a quick recovery: PM @narendramodi

    — PMO India (@PMOIndia) June 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या दुःखद घटनेनंतर भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मीकांत भारद्वाज यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी राज्य सरकारला मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना मदत देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, जखमींना त्वरित उपचार मिळण्याची मागणी केली आहे.

Intro:Body:

rajasthan ram katha pandal falls on people many people died in jasol barmer

rajasthan, ram katha pandal, died, jasol barmer, rain, storm, strong wind

---------------

राजस्थानात जोरदार पावसामुळे पंडाल कोसळून १४ जणांचा मृत्यू, ५० जखमी

बाडमेर - जिल्ह्यातील जसोल कस्बा येथे जोरदार वारा आणि पावसामुळे रामकथा पंडाल कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला. तर, ५० हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. अद्याप बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

या पंडालमध्ये श्री राम कथा कार्यक्रम सुरू होता. यादरम्यान, जोरदार वारा आणि पावसामुळे पंडाल कोसळल्याने ही दुर्घटना घडली. जखमींना नाहटा येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. पोलीस आणि प्रशासकीय कर्मचारी, अधिकारी घटनास्थाळी उपस्थित आहेत.

Conclusion:
Last Updated : Jun 24, 2019, 8:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.