जयपूर : राजस्थान काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट आणि त्यांच्यासोबत असलेल्या १८ आमदारांच्या याचिकेवर शुक्रवारी निकाल जाहीर होणार आहे. राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये यावर सुनावणी सुरू होती.
काँग्रेसच्या संसदीय बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे सचिन पायलट आणि १८ बंडखोर आमदारांना राजस्थान विधानसभा सभापतींनी अपात्र ठरवले होते. याविरोधात पायलट यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
यावर उच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. शुक्रवारी हा निकाल जाहीर केला जाईल. यासोबतच, उच्च न्यायालयाने विधानसभेच्या सभापतींना विनंती केली आहे, की २४ जुलैपर्यंत या आमदारांबाबत कोणतीही कारवाई न करण्याची विनंती केली आहे.