ETV Bharat / bharat

विशेष : 'कॉर्पोरेट सेक्टर'वर सायबर गुन्हेगारांचे लक्ष; 'ई-मेल फॉरवर्डींग'चा नवा फंडा - कॉर्पोरेट सेक्टर सायबर गुन्हे

तुम्ही जर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कार्यरत असाल, तुमच्याकडे चलन, विविध बिल्स तसेच ई-मेल मार्फत आर्थिक व्यवहार सांभाळत असाल, तर सावधान ! कारण आता तुमचे अकाऊंट 'ई-मेल फॉरवर्डर्स'च्या डोळ्यावर आहे. तुमच्या नकळत ई-मेल्स मार्फत महत्त्वाची माहिती आणि चलनांमधील रक्कम कधी बदलू शकते, हे सांगता येत नाही.

mail forwarder
'कॉर्पोरेट सेक्टर'वर सायबर गुन्हेगारांचे लक्ष; 'ई-मेल फॉरवर्डींग'चा नवा फंडा
author img

By

Published : Jun 27, 2020, 7:59 PM IST

Updated : Jun 28, 2020, 9:08 AM IST

जयपूर - तुम्ही जर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कार्यरत असाल, तुमच्याकडे चनल, विविध बिल्स तसेच ई-मेल मार्फत आर्थिक व्यवहार सांभाळत असाल, तर सावधान ! कारण आता तुमचे अकाऊंट 'ई-मेल फॉरवर्डर्स'च्या डोळ्यावर आहे. तुमच्या नकळत ई-मेल्स मार्फत महत्त्वाची माहिती आणि चलनांमधील रक्कम कधी बदलू शकते, हे सांगता येत नाही. सध्या हे ई-मेल फॉरवर्डर्स कॉर्पोरेट कंपन्यांना लक्ष करत आहेत.

जयपूरमध्ये नुकतेच एका हॅकरने ई-मेल फॉरवर्डर लावून एका नामांकित कंपनीचे मेल अकाऊंट हॅक केले. यामार्फत हॅकरने परदेशातील एका ग्राहकाला कंपनीच्या नाले ३८ लाखांच्या पावत्या पाठवल्या. संबंधित प्रकरणाची आस्थापनाला कानोकान बातमी लागली नाही. यामध्ये कंपनीच्या अकाऊंट डिटेल्स अंतर्भूत असल्याने प्रथमदर्शनी ग्राहकाला देखील विश्वास बसला. मात्र योग्य वेळी ग्राहकाने कंपनीला माहिती पुरवल्याने अकाऊंट हॅक झाल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा... #MSMEDay : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर महामारीचे सावट; देशातील 71% कामगारांचे पगार रखडले

ग्राहकाला कंपनीचा पहिला ई-मेल गेल्यानंतर काही काळाने हॅकरने संबंधित ग्राहकाला नव्या पावत्यांसह नवा ई-मेल केला. यामधील चलनांवर वेगळ्या किंमती होत्या. तसेच स्वत:च्या बँक अकाऊंटच्या डिटेल्स देण्यात आल्या. यासोबतच दुसऱ्या ई-मेल मध्ये पुरवण्यात आलेल्या बँकेच्या माहितीवर पैसे पाठवण्याचे सांगण्यात आले.

'कॉर्पोरेट सेक्टर'वर सायबर गुन्हेगारांचे लक्ष; 'ई-मेल फॉरवर्डींग'चा नवा फंडा

मात्र, संबंधित ग्राहकाने कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. हॅकरने पाठवलेल्या बँक डिटेल्स संदर्भात चौकशी केली; यावेळी संपूर्ण प्रकार उघडकीस आला. योग्य वेळी योग्य पाऊल उचलल्याने कंपनीचे ई-मेल अकाऊंट हॅक झाल्याचे कंपनी व्यवस्थापनाच्या लक्षात आले. यामुळे मोठा धोका टळला.

mail forwarder
जयपूरमध्ये नुकतेच एका हॅकरने ई-मेल फॉरवर्डर लावून एका नामांकित कंपनीचे मेल अकाऊंट हॅक केले.

सायबर गुन्ह्यांचे तज्ज्ञ सचिन शर्मा यांनी कॉर्पोरेट कंपन्यांनी आर्थिक व्यवहार करताना अशा प्रकारच्या हॅकर्सच्या जाळ्यात न अडकण्यासाठी कंपन्यांना सायबर सिक्युरिटीकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रत्येक संगणकात अपडेटेड अ‌ॅन्टिव्हायरसचा वापर करण्याचा सल्ला दिलाय. कंपन्यांनी बाजारात उपलब्ध असलेल्या पायरेटेड किंवा नकली अॅन्टिव्हायरसचा वापर टाळण्याचे सांगितले आहे. या प्रकारचे अॅन्टिव्हायरस वेबसाइट किंवा ई-मेल अकाऊंट क्रॅश करू शकतात, असे त्यांनी म्हटले.

हेही वाचा... 'भारतात कोरोनाबाधितांनी ओलांडला 5 लाखांचा टप्पा.. तरीही मोदींचे मौनच'

Last Updated : Jun 28, 2020, 9:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.