जयपूर - कोरोनासारख्या भयंकर आजारातून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण सावधानी बाळगताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सातत्याने लोक आपले हात स्वच्छ करत आहेत. हात स्वच्छ करताना प्रत्येकाने नळाला स्पर्श केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. आता यावरही उपाय शोधून काढला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सेन्सर आणि लेसर तंत्रज्ञानाद्वारे पाण्याचा नळ नियंत्रित केला आहे. ज्याच्या मदतीने नळाला हात न लावता हात धुतले जाऊ शकतात. पण हे तंत्र थोडे महाग आहे. ज्यामुळे प्रत्येकजण ते वापरू शकत नाही.
राजस्थानमधील युवकांनी एकत्र येऊन हे तंत्रज्ञान तयार केले आहे. या युवकांनी तयार केलेल्या तंत्रज्ञानामुळे पाण्याचीही बचत होत आहे आणि संसर्गही टाळला जाऊ शकतो. हे फूट टॅब केवळ 8 तासात तयार केले आहे. लष्कराच्या मॉडेलपासून प्रेरित होऊन त्यांनी हे तंत्रज्ञान तयार केले आहे. पायाने हे तंत्रज्ञान नियंत्रीत केले जाते.