ETV Bharat / bharat

मनसेप्रमुख राज ठाकरे कोलकात्यात दाखल; उद्या घेणार ममतांची भेट - ईव्हीएम मशीन

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांची राज ठाकरे उद्या भेट घेणार आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये ईव्हीएमबाबत चर्चा होणार आहे

राज ठाकरे कोलकात्यात दाखल
author img

By

Published : Jul 30, 2019, 5:41 PM IST

कोलकाता - मनसेप्रमुख राज ठाकरे आजपासून ३ दिवसीय कोलकाता दौऱ्यावर गेले आहेत. राज ठाकरे सध्या कोलकात्यात पोहचले असून तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांची उद्या भेट घेणार आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये ईव्हीएमबाबत चर्चा होणार आहे. ममतांची भेट घेतल्यानंतर १ ऑगस्टला राज मुंबईला परतणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम मशीनवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीत निवडणूक आयोगाला ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करताना बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली होती. आता, राज ठाकरे ममता बॅनर्जी यांच्यासोबत ईव्हीएम विरोधात वातावरण तापवणार असल्याचे बोलले जात आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.