नवी दिल्ली : अशोक गहलोत यांच्या नेतृत्त्वातील राजस्थान सरकारमध्ये सध्या बेबनाव सुरू आहे. त्यातच सचिन पायलट यांची काँग्रेसने राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे, राजस्थानमधील सरकार सध्या 'ऑटोपायलटवर' असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी व्यक्त केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पायलट यांची नाराजी, आणि काँग्रेसमधील पक्षांतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे पायलट हे पक्ष सोडूही शकतात अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पायलट यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे.
-
Sad to see Rajasthan Govt. on auto-pilot because the CM is busy chasing a Pilot.#RajasthanPoliticalCrisis
— Gajendra Singh Shekhawat (@gssjodhpur) July 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Sad to see Rajasthan Govt. on auto-pilot because the CM is busy chasing a Pilot.#RajasthanPoliticalCrisis
— Gajendra Singh Shekhawat (@gssjodhpur) July 13, 2020Sad to see Rajasthan Govt. on auto-pilot because the CM is busy chasing a Pilot.#RajasthanPoliticalCrisis
— Gajendra Singh Shekhawat (@gssjodhpur) July 13, 2020
"राजस्थानचे मुख्यमंत्री पायलटच्या मागे धावत आहेत, त्यामुळे राज्य सरकार सध्या ऑटोपायलटवर आहे; हे अतिशय दुर्देवी आहे" अशा आशयाचे ट्विट शेखावत यांनी केले आहे. यासोबतच, आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी गांधी कुटुंबीयांवर टीका केली आहे.
-
बगावत के सुरों से साफ ज़ाहिर है कि राजा के महल में घुटन बहुत है!#RajasthanPoliticalCrisis
— Gajendra Singh Shekhawat (@gssjodhpur) July 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">बगावत के सुरों से साफ ज़ाहिर है कि राजा के महल में घुटन बहुत है!#RajasthanPoliticalCrisis
— Gajendra Singh Shekhawat (@gssjodhpur) July 14, 2020बगावत के सुरों से साफ ज़ाहिर है कि राजा के महल में घुटन बहुत है!#RajasthanPoliticalCrisis
— Gajendra Singh Shekhawat (@gssjodhpur) July 14, 2020
-
हमेशा हेडमास्टर का बेटा ही अव्वल क्यों ?!!#RajasthanPoliticalCrisis
— Gajendra Singh Shekhawat (@gssjodhpur) July 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">हमेशा हेडमास्टर का बेटा ही अव्वल क्यों ?!!#RajasthanPoliticalCrisis
— Gajendra Singh Shekhawat (@gssjodhpur) July 13, 2020हमेशा हेडमास्टर का बेटा ही अव्वल क्यों ?!!#RajasthanPoliticalCrisis
— Gajendra Singh Shekhawat (@gssjodhpur) July 13, 2020
"पक्षातील सुरू असलेली बंडखोरी पाहता, 'राजमहालात' बरीच घुसमट होत आहे असे दिसून येते" अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच, "मुख्याध्यापकांचाच मुलगा वर्गात पहिला कसा येतो?" अशा आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी काँग्रेसमधील घराणेशाहीवर टीका केली.
हेही वाचा : गांधी कुटुंबीय काँग्रेसच्या तरुण नेत्यांचा मत्सर आणि अपमान करते...उमा भारतींची बोचरी टीका