पाटणा - गुरुवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे बिहारची राजधानी पाटणा जलमय झाली आहे. पाटणा शहराच्या बऱ्याचशा भागातील घरांमध्ये पाणी घुसले आहे. मुसळधार पावसामुळे सरकारी कार्यालये आणि मंत्र्याच्या घरात देखील पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मंत्री देखील घरात अडकून आहेत.
तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे काही भागात तर होड्यांशिवाय जाणे अशक्य झाले आहे. एसडीआरएफकूडन मदतकार्य केले जात आहे. हवामान विभागकडून रविवारी देखील मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा - टेक्सासमध्ये शीख पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या
मुसळधार पावसामुळे सामान्य लोकांबरोबरच व्हीआयपी लोकांचे देखील हाल होत आहेत. ज्या लोकप्रतिनिधींना लोकांच्या सेवेसाठी नेमले त्यांना स्वत: च्या घराची देखील देखरेख करता आली नाही. या अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी प्रशासन सतर्क असून लोकांच्या मदतीसाठी हेल्पलाइन नंबर जाहीर करण्यात आला आहे. तसेच एसडीआरएफ देखील मदतकार्य करण्यासाठी सज्ज आहे.
हेही वाचा - शहीद भगत सिंगांना भारतरत्न पुरस्कार द्या; पाकिस्तानातूनही होतेय मागणी
सरकारने पाटणा शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च केले असले तरी या पावसाने केलेल्या कामांचे पितळ उघडे पडले आहे.