ETV Bharat / bharat

देशभरातील सेवा पूर्ववत होणार असल्याचा दावा रेल्वे विभागाने फेटाळला - रेल्वे सेवा

सेवा सुरू करण्यासंबधी कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. रेल्वे तिकीट रद्द करण्याचा आणि सेवा सुरू होण्याचा काहीही संबध नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

रेल्वे सेवा
रेल्वे सेवा
author img

By

Published : Jun 24, 2020, 9:09 PM IST

नवी दिल्ली - रेल्वे मंत्रालयाने सर्व रेल्वे विभागांना 14 एप्रिल या दिवशी आणि त्याआधी आरक्षित केलेली सर्व तिकीटे रद्द करण्याबाबतचे पत्रक काल (मंगळवारी) जारी केले आहे. त्यानंतर ऑगस्टमध्ये रेल्वे सेवा पूर्ववत होणार असल्याचे वृत्त पसरत आहे, मात्र, रेल्वे मंत्रालयाने हा दावा फेटाळला आहे.

सेवा सुरू करण्यासंबधी कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. रेल्वे तिकीट रद्द करण्याचा आणि सेवा सुरू होण्याचा काहीही संबध नाही. सेवा सुरू करण्याबाबतचा कोणताही निर्णय आरोग्य मंत्रालय आणि गृहमंत्रालयाशी चर्चा करून घेतला जाईल, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

23 जूनला रेल्वेने विभागाने अधिकृत पत्रक काढत 14 एप्रिल आणि आणि त्याआधी आरक्षित केलेली सर्व तिकिटे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना सर्व पैसे रेल्वे माघारी करणार आहे. सध्या रेल्वेकडून देशभरात 230 मेल/ एक्सप्रेस गाड्या सुरू आहेत. 15 विशेष गाड्याही सुरु आहेत. तसेच 200 इतर विशेष गाड्याही सुरू करण्यात आल्या आहेत. पूर्णपणे सर्व सेवा सुरू करण्यात आली नसली तरी भविष्यात आणखी विशेष गाड्या सुरू करण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.