ETV Bharat / bharat

राहुल गांधीच्या 'या' ट्विटमुळे भाजप आणि काँग्रेस समर्थकांमध्ये जुंपली - international yoga day

राहुल गांधीनी योग दिनी केलेले हे ट्विट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. तसेच त्यांच्यावर योग दिनाचा अपमान केला म्हणून टिकाही केली जात आहे.

राहुल गांधींनी शेअर केलेले छायाचित्र
author img

By

Published : Jun 21, 2019, 6:54 PM IST

लखनऊ - आतंरराष्ट्रीय योग दिनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीनी एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये आर्मी श्वान पथकाच्या जवानांबरोबर श्वानही योगा करताना दिसत आहेत. या ट्विटला त्यांनी 'नया इंडिया' असे कॅप्शन दिले आहे. यावरुन नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

राहुल गांधीनी योग दिनी केलेले हे ट्विट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. तसेच त्यांच्यावर योग दिनाचा अपमान केला म्हणून टीकाही केली जात आहे. राहुल गांधींनी भारतीय सेना आणि संस्कृतीचा अपमान करत असल्याचे प्रत्युत्तर काही लोकांनी त्यांना दिले आहे. तसेच भाजप आणि काँग्रेस पक्षाचे समर्थक एकमेकांवर तुटून पडले आहे.

भारतीय योगा जगभरामध्ये प्रसिद्ध होत आहे. त्याचा अपमान करण्याचा अधिकार राहुल गांधीना नसल्याचे काही लोकांनी म्हणले आहे. हा शुर अशा श्वान पथकाचा अपमान असल्याचेही काहीजण म्हणाले आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.