ETV Bharat / bharat

'विरोध केल्यास मोहन भागवतांनाही नरेंद्र मोदी दहशतवादी म्हणतील'

author img

By

Published : Dec 24, 2020, 1:05 PM IST

कृषी कायद्यासंदर्भात आज काँग्रेस नेते राहुल गांधींसोबत काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. देशातील शेतकरीच नाही, तर जो कोणी सरकार आणि नरेंद्र मोदींचा विरोध करेल. त्याला दहशतवादी आणि देशद्रोही म्हटलं जात. हे तर शेतकरीच आहेत. एखाद्या दिवशी मोहन भागवत यांनी मोदींचा विरोध केला. तर त्यांनाही दहशतवादी म्हणतील. जो कोणी मोदींकडून सत्ता घेण्याचा प्रयत्न करणार त्याला दहशतवादी ठरवलं जाणार, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी
राहुल गांधी

नवी दिल्ली - कृषी कायद्यासंदर्भात आज काँग्रेस नेते राहुल गांधींसोबत काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपतींना 2 कोटी शेतकऱ्यांची स्वाक्षरी असलेलं निवेदन दिलं. तसेच त्यांनी राष्ट्रपतींना संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवून नवीन कायदे मागे घेण्याचे आवाहन राहुल गांधींनी केले. यावेळी त्यांनी चीन, कोरोना आणि कृषी कायद्यांवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

कोरोनाला केंद्र सरकारने गांभीर्यांने घ्याव. वेळीच पाऊल उचललं तर आणखी लोकांना जीव गमवावा लागणार नाही. कोरोनामुळे नुकसान होणार सांगितलं होत. मात्र, पण कोणी ऐकलं नाही आणि खिल्ली उडवली. मात्र, मी आज पुन्हा सांगत आहे. शेतकरी, मजुरासमोर कोणतीही शक्ती उभी राहू शकत नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

मोदी चीनवर काहीच बोलत नाहीत -

नरेंद्र मोदी फक्त गरिबांचा पैसा उद्योगपतींच्या खिशात घालण्याच काम करत आहेत. त्यांच्याकडे संपूर्ण भारत सोपवला आहे, अशी टीका राहुल गांदी यांनी केली. तसेच त्यांनी चीनवरून मोदींवर निशाणा साधला. चीनने भारताची हजारो किलोमीटर जमीन अनधिकृतरीत्या बळकावली आहे. त्यावर मोदी काहीच का बोलत नाहीत, असेही राहुल गांधी म्हणाले.

संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवून कायदे मागे घ्या -

शेती कायदे रद्द करेपर्यंत शेतकरी घरी परत जाणार नाहीत. सरकारने संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवून हे कायदे मागे घ्यावेत. विरोधी पक्ष शेतकरी व मजुरांच्या पाठीशी उभे आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. कृषी कायदे शेतकरीविरोधी आहेत. शेतकरी या कायद्यांच्या विरोधात उभे आहेत, हे जनता पाहत आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

मोहन भागवतांनाही देशद्रोही म्हणतील -

देशातील शेतकरीच नाही, जो कोणी सरकार आणि नरेंद्र मोदींचा विरोध करेल. त्याला दहशतवादी आणि देशद्रोही म्हटले जात. हे तर शेतकरीच आहेत. एखाद्या दिवशी मोहन भागवत यांनी मोदींचा विरोध केला. तर त्यांनाही दहशतवादी म्हणतील. थोडक्यात जो कोणी मोदींकडून सत्ता घेण्याचा प्रयत्न करणार त्याला दहशतवादी ठरवलं जाणार, असे राहुल गांधी म्हणाले.

देशात लोकशाही राहिली नाही -

एका पत्रकाराशी बोलताना राहुल गांधींनी लोकशाहीवरून मोदींवर टीका केली. देशात लोकशाही शिल्लक नाही. लोकशाही कुठे आहे? आपण कोणत्या देशाबद्दल बोलत आहात? भारतात लोकशाही ही फक्त चर्चा आणि विचारात उरली आहे. चीन सीमेवर बसला आहे आणि नरेंद्र मोदी देश कमकुवत करण्याचा फायदा घेत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले -

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रपती भवनाकडे पायी मार्च काढण्यात आला. मात्र, राहुल यांच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आणि दिल्लीत कलम 144 लागू केले आहे. पोलिसांनी केवळ तीनच नेत्यांना राष्ट्रपती भवनाकडे जाण्यास परवानगी दिली आहे. राष्ट्रपती भवनाकडे निघालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा - #निरोप २०२० : राष्ट्रीय राजकारणाला कलाटणी देणाऱ्या वर्षभरातील महत्वाच्या घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.