ETV Bharat / bharat

काँग्रेसमध्ये राहुल गांधींना पर्याय नाही; पुन्हा एकदा शिक्कामोर्तब

लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधीनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, काँग्रस कमिटीने त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता.

author img

By

Published : Jun 14, 2019, 8:21 AM IST

राहुल गांधी

नवी दिल्ली - राहुल गांधीच काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहावे, अशी इच्छा काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यासंबंधी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाल यांच्या राहुल गांधीच अध्यक्ष म्हणून कायम राहतील या वक्तव्याला काँग्रस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी दुजोरा दिला आहे. मात्र, राहुल गांधींनी या वृत्ताला पुष्टी दिलेली नाही. काँग्रेसमध्ये मागील अनेक दिवासांपासून नेतृत्व करण्यावरून खल सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधीनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, काँग्रस कमिटीने त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता. याविषयी काँग्रेस कमिटीने राहुल गांधी राजीनामा न देता अध्यक्षपदी कायम राहावे, असा आग्रह धरला होता. मात्र, राहुल गांधी त्यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत.

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी बुधावारी काँग्रेसला अध्यक्ष म्हणून राहुल गांधीच हवे आहेत, असा पुनरुच्चार केला होता. बुधवारी झालेल्या या बैठकीत गांधी परिवारातील कोणताही सदस्य हजर नव्हता. या बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चा झाली. मात्र, राहुल गांधींना पर्याय नसल्याचे सांगत त्यांनाच कायम ठेवण्याच निर्णय घेण्यात आला.

या विषयी काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "बुधवारी झालेल्या बैठकीत काँग्रेस कमिटीने घेतलेल्या निर्णयापेक्षा मी काही वेगळे बोलू इच्छीत नाही. राहुल गांधीच काँग्रेस अध्यक्ष होते, आहेत आणि यापुढेही राहतील."

Intro:Body:

National 01

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.