ETV Bharat / bharat

नरेंद्र मोदी नव्हे हे तर 'सरेंडर मोदी', राहुल गांधींची खोचक टीका

author img

By

Published : Jun 21, 2020, 6:26 PM IST

राहुल गांधींनी केलेले ट्विट 20 हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी लाईक केले तर 8 हजारांपेक्षा जास्त वेळा रिट्विट करण्यात आले. 9 हजार प्रतिक्रियाही आल्या आहेत. ट्विट करताना 'सरेंडर' शब्दाचे स्पेलिंग चुकल्यामुळे अनेक नेटिझन्सनी राहुल गांधींना स्पेलिंग नीट करण्याचा सल्ला दिला.

राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी
राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली - चीनी सैनिकांनी भारतीय भूमीत घुसखोरी केली नसून कोणतीही लष्करी चौकी ताब्यात घेतली नाही, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. नरेंद्र मोदी हे खरे तर 'सरेंडर मोदी' असल्याची खोचक टीका राहुल गांधींनी ट्विटवरून केली आहे.

एका आंतरराष्ट्रीय दैनिकाचा लेख ट्विटरवर शेअर करत राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली आहे. शुक्रवारी(19 जून) झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले होते. यावेळी त्यांनी चीनने भारतात अतिक्रमण केले नसल्याचे म्हटले होते. यावरून राहुल गांधींसह काँग्रेस पक्षाने पंतप्रधानांवर टीका केली होती. ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनीही पत्रकार परिषद घेत काही प्रश्न उपस्थित केले होते.

कोठे आणि का भारतीय जवान मारले गेले? ज्या ठिकाणी हाणामारी झाली ती जागा चीनची होती का? असे प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केले. पंतप्रधान मोदींनी चीनच्या अतिक्रमणापुढे आत्मसमर्पण केल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला. राहुल गांधींनी केलेले ट्विट 20 हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी लाईक केले तर 8 हजारांपेक्षा जास्त वेळा रिट्विट करण्यात आले. 9 हजार प्रतिक्रियाही आल्या. ट्विट करताना 'सरेंडर' शब्दाचे स्पेलिंग चुकल्यामुळे अनेक नेटिझन्सनी राहुल गांधींना स्पेलिंग नीट करण्याचा सल्ला दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.