नवी दिल्ली - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. मोदी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेताहेत, तेही बंद दरवाज्याआड असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.
मोदी हे पहिल्यांदा पत्रकार परिषद घेत आहेत. या परिषदेत त्यांनी सर्वांना प्रवेश दिला नाही, असेही गांधी म्हणाले.
राहूल गांधी म्हणाले...
- मी मोदी नाही, जेष्ठांना डावलणार नाही
- या पाच वर्षात सरकारची पोलखोल केली
- मोदींच्या आई-वडीलांचा आदर करतो
- २३ मे ला जनतेचा मूड देशाला कळेल
- मायावती, मुलायमसिंह, ममता, चंद्रबाबू हे मोदींचे समर्थन करणार नाहीत, असे मला वाटते
- मोदी हे रोफेलबाबत माझ्याशी चर्चा करत नाहीत
- मी मोदींना चर्चा करण्याचे आव्हान देतो
- या निवडणुकित निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद होती.