ETV Bharat / bharat

गांधी कुटुंबीय काँग्रेसच्या तरुण नेत्यांचा मत्सर आणि अपमान करते...उमा भारतींची बोचरी टीका - उमा भारती बातमी

राजस्थानातील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. तसेच राज्यातील परिस्थितीबाबत दिल्लीतील पक्ष नेतृत्वाशी सचिन पायलट आणि समर्थक गट चर्चा करत आहे. काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनीही सचिन पायलट यांच्याशी चर्चा केली आहे.

उमा भारती
उमा भारती
author img

By

Published : Jul 14, 2020, 4:30 PM IST

भोपाळ - राजस्थानातील सत्ता संघर्षास ज्येष्ठ भाजप नेत्या उमा भारती यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि संपूर्ण गांधी कुटुंबियांना जबाबदार धरले आहे. गांधी कुटुंबीय तरुण नेत्यांचा मत्सर आणि अपमान करत असल्याची बोचरी टीका त्यांनी केली.

भोपाळमध्ये पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, 'राजस्थानमधील सत्ता संघर्ष राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबामुळं उद्भवलाय. कारण गांधी कुटुंबीय तरुण नेत्यांचा अपमान आणि मत्सर करतात. ते फक्त मनोरुग्णांना सत्तेत ठेवण्याचा प्रयत्न करतात'. राजस्थानात काँग्रेस नेते सचिन पायलट आणि समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर उमा भारती यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

राजस्थानातील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. तसेच राज्यातील परिस्थितीबाबत दिल्लीतील पक्ष नेतृत्त्वाशी सचिन पायलट आणि समर्थक गट चर्चा करत आहे. काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनीही सचिन पायलट यांच्याशी चर्चा केली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला. त्यामुळे राज्यातील कमलनाथ सरकार पडले. भाजपची सत्ता मध्यप्रदेशात स्थापन झाली. नव्याने बनविण्यात आलेल्या मंत्रीमंडळात एक डजन सिंधिया समर्थकांना मंत्रीपदे मिळाली आहेत. सिंधिया यांचे भविष्य उज्ज्वल असून त्यांच्या मागे माझे आशीर्वाद असल्याचे उमा भारती म्हणाल्या.

सचिन पायलट यांच्याशी राहुल गांधी, प्रियंका गांधी, अहमद पटेल, पी. चिदंबरम आणि के. सी. वेणुगोपाल सारख्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केली आहे. काँग्रेस विधीमंडळ बैठकीला गैरहजर राहिल्याने सचिन पायलट यांचे उपमुख्यमंत्री पद आणि राज्याचे काँग्रेस प्रमुख पद काढून घेण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.