ETV Bharat / bharat

१ नोकरी आणि १ हजार बेरोजगार, आपण देशाचे काय केले? राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

देशातील वाढत्या बेरोजगारीबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. देशात १ नोकरी आणि १ हजार नागरिक बेरोजगार असून देशाचे काय केले? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुला गांधी
राहुला गांधी
author img

By

Published : Aug 24, 2020, 3:58 PM IST

नवी दिल्ली- देशातील वाढत्या बेरोजगारीबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. देशात १ नोकरी आणि १ हजार नागरिक बेरोजगार असून देशाचे काय केले? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. देशातील वाढती बेरोजगारी दाखवण्यासाठी त्यांनी एका माध्यमाचा अहवाल आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

२० ऑगस्टला देखील राहुल गांधी यांनी देशातील रोजगारासंबंधी चर्चा केली होती. यात त्यांनी अधिस्थगन काळानंतर मोठ्या प्रमाणात लघू आणि मध्यम उद्योग बंद पडणार व त्यानंतर देशातील युवकांना रोजगार मिळणार नसल्याचे भाकित केले होते.

तसेच, देशातील ९० टक्के रोजगार हे असंघटित क्षेत्रातून निर्माण होतात. मात्र, अधिस्थगन काळानंतर या क्षेत्रातील व्यवसाय बुडतील व त्यानंतर रोजगाराची समस्या निर्माण होईल असेही त्यांनी सांगितले होते. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरले होते.

हेही वाचा- ‘माफी मागितल्यास माझ्या विवेकाचा अपमान’

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.