नवी दिल्ली- चीनचे सैनिक सीमारेषेवर आल्याबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारला विचारणा केली आहे. चीनचे सैनिक भारतात आले नाहीत, याबाबत सरकार पुष्टी देणार आहे का ? असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला आहे.
राहुल गांधींनी ट्विट करत चीन आणि भारतामधील तणावाच्या स्थितीविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी ट्विटमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यदलात वरिष्ठ पातळीवर सहा जूनला बैठकीविषयीचे वृत्तही राहुल गांधींनी जोडले आहे.
-
Can GOI please confirm that no Chinese soldiers have entered India?https://t.co/faR5fxEqQO
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Can GOI please confirm that no Chinese soldiers have entered India?https://t.co/faR5fxEqQO
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 3, 2020Can GOI please confirm that no Chinese soldiers have entered India?https://t.co/faR5fxEqQO
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 3, 2020
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनचे सैनिक मोठ्या प्रमाणात जमा झाल्याचे त्या वृतात मान्य केले आहे. दरम्यान चीनचे सैनिक हे पूर्व लडाखच्या भागात जमा झाल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते.
राहुल गांधी यांनी 29 मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर टीका केली होती. त्यांनी ट्विट करत चीनबरोबर सीमारेषेबाबत असलेल्या स्थितीवर सरकार शांत का आहे? असा प्रश्न गांधींनी विचारला होता.
अनिश्चिततेच्या काळात खूप मोठा संशय निर्माण होत असल्याचेही राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले होते. सरकारने स्वच्छपणे काय नक्की घडत आहे, हे देशाला सांगावे, अशी काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी अपेक्षा व्यक्त केली होती.
यापूर्वीही सीमारेषेबाबतची माहिती सरकारने लोकांना सांगावी, अशी त्यांनी मागणी केली होती. लडाख आणि चीनच्या प्रश्नावर सरकारने पारदर्शकता दाखविण्याची गरज असल्याचे गांधींनी म्हटले होते.
दरम्यान, लडाखमध्ये भारताने सुरू केलेल्या रस्ते कामाबद्दल चीनचे आक्षेप नोंदविला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये गेल्या काही दिवसापासून तणावाची स्थिती आहे.