पाटणा - दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आता बिहार विधानसभा निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. जेडीयूचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार विनोद चौधरी यांची मुलगी पुष्पम प्रिया चौधरी ही बिहार विधानसभा निवडणूक लढणार आहे. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून तीने स्वतःची घोषणा केली असून प्लूरल्स असे तीने आपल्या पक्षाचे नाव जाहीर केले आहे.
-
Bihar needs pace, Bihar needs wings, Bihar needs change. Because Bihar deserves better and better is possible. Reject bullshit politics, join Plurals to make Bihar run and fly in 2020. #PluralsHasArrived #ProgressiveBihar2020 pic.twitter.com/GiQU00oiJv
— Pushpam Priya Choudhary (@pushpampc13) March 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Bihar needs pace, Bihar needs wings, Bihar needs change. Because Bihar deserves better and better is possible. Reject bullshit politics, join Plurals to make Bihar run and fly in 2020. #PluralsHasArrived #ProgressiveBihar2020 pic.twitter.com/GiQU00oiJv
— Pushpam Priya Choudhary (@pushpampc13) March 8, 2020Bihar needs pace, Bihar needs wings, Bihar needs change. Because Bihar deserves better and better is possible. Reject bullshit politics, join Plurals to make Bihar run and fly in 2020. #PluralsHasArrived #ProgressiveBihar2020 pic.twitter.com/GiQU00oiJv
— Pushpam Priya Choudhary (@pushpampc13) March 8, 2020
बिहारच्या प्रगतीला वेग हवा असून बिहारमध्ये बदल होणे गरजेच आहे. कारण, बिहारच्या जनतेचा तो अधिकार आहे. तुम्ही प्लूरल्स पक्षासोबत जोडले जा आणि घाणेरड्या राजकारणाला नकार द्या, असे आवाहन तीने टि्वट्च्या माध्यमातून बिहारच्या लोकांना केले आहे. बिहारला योग्य ब्लू प्रिंटची गरज असून प्लूरल्सकडे तसा रोडमॅप आहे. जर मी निवडणूक जिंकले तर बिहार देशातील विकसित राज्य होईल, असेही तीने म्हटले आहे.
पुष्पम प्रिया हीने 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' आणि पॉलिटिकलमधून 'मास्टर ऑफ पब्लिक एडमिनिस्ट्रेशन'चे शिक्षण घेतले आहे. यूनिव्हर्सिटी ऑफ ससेक्समधील आयडीएसमधून डेव्हलपमेंट स्टडीजमध्ये एमएपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.
243 सदस्य संख्या असलेल्या बिहार विधानसभेची निवडणूक या वर्षी ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. 2015 मध्ये भाजपने येथे 53 जागा जिंकल्या होत्या. तर सत्ताधारी जदयूने महाआघाडीसोबत निवडणूक लढवत 71 जागांवर विजय मिळवला होता.