ETV Bharat / bharat

धक्कादायक..! क्षुल्लक कारणावरून आईने केला सहा वर्षांच्या चिमुकल्याचा खून - पंजाब गुन्हे

आईने आपल्या सहा वर्षाच्या मुलाचा क्षुल्लक कारणावरून खून केल्याची घटना सोमवारी पंजाबच्या सोहल जागीर या गावात घडली आहे. तो चिमुकला आईपेक्षा आपल्या आजीसोबत राहायचा. असे या हत्येमागचे कारण उलगडले आहे.

murder
आईकडून सहा वर्षांच्या चिमुकल्याचा खून; कारण ऐकून व्हाल थक्क..!
author img

By

Published : Jun 11, 2020, 8:41 AM IST

जालंधर (पंजाब) - आईने आपल्या सहा वर्षाच्या मुलाचा क्षुल्लक कारणावरून खून केल्याची घटना सोमवारी पंजाबच्या सोहल जागीर या गावात घडली आहे. स्वयंपाकगृहातील चाकूने मुलाचा खून केल्यानंतर आईने घरावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र ती जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो चिमुकला आईपेक्षा जास्त आपल्या आजीसोबत राहायचा. म्हणून तिने त्याचा खून केला असल्याचे कारण समोर येत आहे.

आरोपी कुलविंदर कौरचे पती सुरजीत सिंह (वय-३०) हे सध्या इटलीमध्ये आहेत. कुटुंबातील सदस्याने सांगितलेल्या माहितीनुसार, सासू आणि सुनेमध्ये दररोज कुठल्याही क्षुल्लक कारणावरून वाद होत असे. ही घटना घडण्याच्याआधी सुद्धा त्या दोघींमध्ये भांडण झाले होते. आपला मुलगा सारखा आजीकडे राहत असल्यामुळे आरोपी आई सतत नाराज असायची. त्यामुळे तिने मुलाची हत्या केल्या माहिती सुत्रांनी दिली. या प्रकरणी आरोपी आई विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.