हैदराबाद - कोरोना विषाणूच्या गोंधळात घेण्यात आलेल्या जेईई (अॅडव्हान्स)मध्ये आयआयटी मुंबई विभागाचा चिराग फालोर देशात पहिला आला आहे. चिरागने ३९६ पैकी ३५२ गुण मिळवत देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. चिराग हा मूळचा पुण्याचा आहे. तर, आयआयटी रुरकीच्या कनिष्का मित्तल हिने मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. तिला ३९६ पैकी ३१५ गुण मिळाले.
सप्टेंबर 1 ते 6 दरम्यान घेण्यात आलेल्या जेईई अॅडव्हान्ससाठी देशभरातून ४३ हजार २०४ परीक्षार्थी २०२०च्या पात्र ठरले होते. कोरोना काळात अत्यंत कडक खबरदारी घेत जेईई अॅडव्हान्स घेण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांची संख्या 600वरून एक हजारांवर करण्यात आली होती.