ETV Bharat / bharat

'या' देशातही बॅन आहे पबजी... - पबजी

तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलेल्या पबजी गेमवर सरकारने बंदी घातली आहे. ब्रेंडन ग्रीन यांनी हा गेम तयार केला आहे.

पबजी
पबजी
author img

By

Published : Sep 4, 2020, 7:27 PM IST

हैदराबाद - तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलेल्या पबजी गेमवर सरकारने बंदी घातली आहे. 2017 मध्ये हा गेम लाँच झाला होता. उच्चस्तरीय ग्राफिक्स आणि त्याला दिलेली ऑनलाइन तंत्रज्ञानाची जोड या प्रमुख वैशिष्ट्यांमुळे लाँच झाल्यानंतर काहीच दिवसात तो सर्वांत लोकप्रिय गेम ठरला होता.

या गेमध्ये एकाचवेळी 100 जणांना लढता येत होते. तर जो शेवटी जिंकेल त्याला गेममध्ये चिकन डिनर मिळायचा. ब्रेंडन ग्रीन यांनी हा गेम तयार केला आहे. हा गेम ब्लूहोलची उपकंपनी असलेल्या पबजी कॉर्पोरेशनने विकसित आणि प्रसारित केला आहे.

पबजी हा सर्वाधिक विक्रीचा गेम ठरला आहे. बॅटल रॉयल टायटल गेम पबजीने या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत जवळपास 9 हजार 731 कोटी रुपये जागतिक उत्पन्न मिळवले आहे. यासह पबजीचे लाईफटाईम कलेक्शन जवळपास 22 हजार 457 कोटी झाले आहे. मार्च 2020 मध्ये पबजीने 270 दशलक्ष डॉलर्सची विक्रम नोंदवली.

पबजी गेम भारतात सर्वांत जास्त डाऊनलोड करण्यात आला आहे. मार्च 2019 मध्ये पबजी गेमवर गुजरातच्या अहमदाबाद, राजकोट, सुरत, वडोदरा आणि भावनगर जिल्ह्यात बंदी घालण्यात आली होती. हा गेम खेळणाऱ्या युवकांनाही पोलिसांनी अटक केली होती. मात्र, एका आठवड्यानंतरच त्यावरील बॅन काढण्यात आले.

गेल्या जून महिन्यात पाकिस्तानमध्ये तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. तसेच ईराकमध्ये 2019 ला या गेमवर बंदी घालण्यात आली होती. इंडोनेशिया, जॉर्डन आणि नेपाळनेही 2019 मध्ये पबजीवर बंदी घातली होती. मात्र, नेपाळमधील बंदी तेथील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उठवण्यात आली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.