पटना - बिहारची राजधानी पटनामध्येदेखील नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलन तीव्र झाले आहे. येथील कारगिल चौकामध्ये आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर जाळपोळ करत, पोलीस चौकीलाच आग लावल्याची घटना घडली.
हजारोंच्या संख्येने जमलेल्या आंदोलकांनी आजूबाजूला असलेल्या गाड्यादेखील पेटवल्या. यासोबतच त्यांनी जोरदार दगडफेक सुरू केली, यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले. पोलीस प्रशासन परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. अग्नीशमन दलाच्या गाड्यादेखील घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
हेही वाचा : #CAA: हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील इंटरनेट सेवा बंद