लखनौ - तबलिगी जमात कार्यक्रमात सहभागी झालेल्या अलाहाबाद विद्यापीठातील प्राध्यापक मोहम्मद शाहीद यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांनी अलाहाबाद शहरातील स्थानिक मशिदीमध्ये परदेशी नागरिकांना आसरा दिला होता, तसेच पोलिसांना याबाबत माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती.
16 परदेशी व्यक्तींसह 29 जणांनी तबलिगी कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यात प्राध्यापक मोहम्मद शाहीद हेही सहभागी झाले होते. तबलिगी जमात कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांना निवारा दिल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे, असे जिल्हा पोलीस अधिक्षक ब्रिजेश कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले. एका मशिदीमध्ये त्यांना आसरा दिला होता. याबाबत पोलिसांनी माहिती दिली नव्हती त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती.
अलाहाबादमधील कोटवा बानी येथील एका मशिदीत थांबलेल्या इंडोनेशियन व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते.