लखनौ - काँग्रेस महासचिव प्रियंका गांधींच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा बदल झाला आहे. आता त्या फैजाबादऐवजी अमेठीतून संपर्क अभियान सुरू करणार आहेत. काँग्रेसकडून याबाबत सविस्तर वेळापत्रकही जारी करण्यात आले आहे.
प्रियंका बुधवारी सकाळी १० वाजून २० मिनिटांनी लखनौ विमानतळावर पोहोचतील. याठिकाणी १० मिनिटे थांबून अमेठीसाठी रवाना होतील. जवळपास १ वाजून ३० मिनिटांनी त्या मुसाफिरखाना येथे पोहोचतील. याठिकाणी त्या कार्यकर्त्यांसोबत बैठक करतील. ही बैठक दीर्घ असून जवळपास ८ तास चालेल, असे सांगण्यात आले आहे.
बैठकीनंतर रात्री ८ वाजेनंतर त्या विश्रामासाठी रायबरेलीच्या भूयेमऊ गेस्ट हाऊससाठी रवाना होतील. उद्या (गुरुवारी) याच गेस्ट हाऊसमध्ये दिवसभर कार्यकर्त्यांसोबत बैठक करतील आणि रात्री पुन्हा त्याच ठिकाणी विश्रांती घेतील, असेही सांगण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्या गेस्ट हाऊसहून कुमारगंजमार्गे फैजाबाद लोकसभा क्षेत्राचा दौरा करतील. दुपारी १२ ते संध्याकाळी ६ पर्यंत हा कार्यक्रम चालेल. संध्याकाळी ७ वाजता प्रियंका फैजाबादहून लखनौ विमानतळासाठी रवाना होतील. येथून रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी दिल्लीला रवाना होतील. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार प्रियंका २७ मार्चपासून अयोध्येतून आपल्या संपर्क अभियानाला सुरुवात करणार होत्या.
प्रियंका गांधींच्या कार्यक्रमात बदल; 'असे' असेल वेळापत्रक - लोकसभा निवडणूक २०१९
आता त्या फैजाबादऐवजी अमेठीतून संपर्क अभियान सुरू करणार आहेत. काँग्रेसकडून याबाबत सविस्तर वेळापत्रकही जारी करण्यात आले आहे.
लखनौ - काँग्रेस महासचिव प्रियंका गांधींच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा बदल झाला आहे. आता त्या फैजाबादऐवजी अमेठीतून संपर्क अभियान सुरू करणार आहेत. काँग्रेसकडून याबाबत सविस्तर वेळापत्रकही जारी करण्यात आले आहे.
प्रियंका बुधवारी सकाळी १० वाजून २० मिनिटांनी लखनौ विमानतळावर पोहोचतील. याठिकाणी १० मिनिटे थांबून अमेठीसाठी रवाना होतील. जवळपास १ वाजून ३० मिनिटांनी त्या मुसाफिरखाना येथे पोहोचतील. याठिकाणी त्या कार्यकर्त्यांसोबत बैठक करतील. ही बैठक दीर्घ असून जवळपास ८ तास चालेल, असे सांगण्यात आले आहे.
बैठकीनंतर रात्री ८ वाजेनंतर त्या विश्रामासाठी रायबरेलीच्या भूयेमऊ गेस्ट हाऊससाठी रवाना होतील. उद्या (गुरुवारी) याच गेस्ट हाऊसमध्ये दिवसभर कार्यकर्त्यांसोबत बैठक करतील आणि रात्री पुन्हा त्याच ठिकाणी विश्रांती घेतील, असेही सांगण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्या गेस्ट हाऊसहून कुमारगंजमार्गे फैजाबाद लोकसभा क्षेत्राचा दौरा करतील. दुपारी १२ ते संध्याकाळी ६ पर्यंत हा कार्यक्रम चालेल. संध्याकाळी ७ वाजता प्रियंका फैजाबादहून लखनौ विमानतळासाठी रवाना होतील. येथून रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी दिल्लीला रवाना होतील. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार प्रियंका २७ मार्चपासून अयोध्येतून आपल्या संपर्क अभियानाला सुरुवात करणार होत्या.
प्रियंका गांधींच्या कार्यक्रमात बदल; 'असे' असेल वेळापत्रक

Conclusion: