ETV Bharat / bharat

‘नो टेस्टिंग=नो कोरोना हे तर गुन्हेगारी कृत्य’ प्रियंका गांधींची योगी सरकारवर टीका

author img

By

Published : Jun 12, 2020, 9:08 PM IST

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी कोरोना चाचणीच्या मुद्द्यावरून उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर टीका केली. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्ताचा हवाला देत त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या कामाच्या पद्धतीवरही टीका केली.

प्रियंका गांधी
प्रियंका गांधी

नवी दिल्ली - काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी कोरोना चाचणीच्या मुद्द्यावरून उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली. चाचणी नाही म्हणजे कोरोना नाही ही पॉलिसी लोकांना अंधारात ठेवण्यासाठी आहे, असे त्या म्हणाल्या.

कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या घेत असल्यावरून राज्याचे मुख्य सचिव एका जिल्हाधिकाऱ्यांवर संतापले. या संबधीचे ट्विट माजी आयएएस अधिकाऱ्याने केले होते. त्यानंतर या माजी अधिकाऱ्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता, असे वृत्त माध्यमांमध्ये आले होते. त्याचा हवाला देत प्रियंका गांधींनी भाजप सरकारला लक्ष्य केले.

कोरोना पासून सुरक्षा = मोठ्य़ा प्रमाणात चाचण्या. हे लोकांच्या हितामध्ये आहे. तर ‘चाचणी नाही = कोरोना नाही’ ही पॉलिसी लोकांना अंधारात ठेवण्यासाठी असून ही गुन्हेगारी कृत्य आहे, असे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले.

जर एखाद्या माजी अधिकाऱ्याने प्रश्न उपस्थित केला असेल तर सरकारने त्यावर उत्तर द्यायला पाहिजे. त्याऐवजी गुन्हा दाखल केला, असे पूर्व दिल्लीच्या काँग्रेस सचिव प्रियंका गांधी म्हणाल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.