नवी दिल्ली - काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर कलम ३७० हटण्याच्या मुद्यावरून हल्ला चढवला. 'राष्ट्रवादाच्या नावाखाली काश्मिरींना दडपले जातेय. हे असे किती दिवस सुरू राहणार? यापेक्षा जास्त राजकीय आणि राष्ट्रविरोधी काही असू शकत नाही. जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरून राजकारण केले जातेय असा आरोप विरोधकांवर केला जातोय,' असे ट्विट प्रियांका गांधींनी केला आहे. यामध्ये त्यांनी एका युजरचे ट्विट री-ट्विट केले आहे.
-
How long is this going to continue?This is one out of millions of people who are being silenced and crushed in the name of “Nationalism”.
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
For those who accuse the opposition of ‘politicising’ this issue: https://t.co/IMLmnTtbLb
">How long is this going to continue?This is one out of millions of people who are being silenced and crushed in the name of “Nationalism”.
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 25, 2019
For those who accuse the opposition of ‘politicising’ this issue: https://t.co/IMLmnTtbLbHow long is this going to continue?This is one out of millions of people who are being silenced and crushed in the name of “Nationalism”.
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 25, 2019
For those who accuse the opposition of ‘politicising’ this issue: https://t.co/IMLmnTtbLb
'काश्मिरींच्या लोकशाही अधिकारांवर गदा आणली जातेय. या विरोधात आवाज उठवणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आम्ही ते करणारच,' असे प्रियांका यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांनी एका ट्विटर युजरचे ट्विट री-ट्विट केले आहे. या यूजरने आपल्या ट्विटमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात एक महिला विमानात राहुल गांधींना काश्मीरच्या सद्यस्थितीबाबत सांगताना रडत असल्याचे दिसत आहे. अरुण कुमार सिंह असे या युजरचे नाव आहे.
राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या १२ नेत्यांच्या शिष्टमंडळाला शनिवारी श्रीनगर विमानतळावरूनच परत पाठवण्यात आले होते. कलम ३७० हटवल्यानंतर राहुल गांधी काश्मीरच्या परिस्थितीचा आढावा घेणार होते. ते तेथील स्थानिकांची भेट घेऊ इच्छित होते. मात्र, त्यांना अडवण्यात आले. तसेच, विमानतळावरून परत पाठवण्यात आले. यानंतर प्रियंका गांधींनी ट्विटद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये ते श्रीनगर विमानतळावर अधिकाऱ्यांना अडवण्याचे कारण विचारत आहेत. 'आम्ही जम्मू-काश्मीरच्या लोकांना का भेटू शकत नाही? जम्मू-काश्मीरमधील वातावरण सामान्य असेल तर मग आम्हाला का अडवले जात आहे? आम्ही राज्यपालांच्या निमंत्रणावरून येथे आलो आहोत,' असे राहुल गांधी या व्हिडिओत अधिकाऱ्यांना सांगत असल्याचे दिसत आहे.