नवी दिल्ली - जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. त्यावरून प्रियंका गांधी यांनी इंडिया गेटवर सुरू केलेले आंदोलन संपले आहे. त्यामध्ये काँग्रेस नेतेही सहभागी झाले होते.
-
Priyanka Gandhi Vadra, Congress: Every person in Congress will fight against this tyranny and stand with the students. https://t.co/zThcd2bNHZ
— ANI (@ANI) 16 December 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Priyanka Gandhi Vadra, Congress: Every person in Congress will fight against this tyranny and stand with the students. https://t.co/zThcd2bNHZ
— ANI (@ANI) 16 December 2019Priyanka Gandhi Vadra, Congress: Every person in Congress will fight against this tyranny and stand with the students. https://t.co/zThcd2bNHZ
— ANI (@ANI) 16 December 2019
देशामधील परिस्थिती बिघडली आहे. पोलीस विद्यापीठामध्ये घुसून विद्यार्थांना मारहाण करत आहेत. सरकार संविधानासोबत छेडछाड करत असून आम्ही संविधानाच्या संरक्षणासाठी लढत राहू, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. प्रियंका गांधी 4 वाजता अंदोलनाला बसल्या होत्या. त्यानंतर 2 तास आंदोलन चालले.
प्रियंका गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकार संविधान आणि विद्यार्थांवर हल्ले करत आहे. संविधानला वाचवण्यासाठी आम्ही सरकारच्या हुकूमशाहीविरुद्ध लढत राहु, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी नागरिक्तव सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. काल रविवारी या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. त्यानंतर शहरात ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड झाली. आंदोलक विद्यार्थ्यांनी ही तोडफोड केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. तर, पोलिसांनी स्वतःच आग लावल्याचे आणि तोडफोड केलेले विवादास्पद व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांमध्ये पसरले आहेत. दुसरीकडे, पोलिसांनी विनापरवानगी विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थी संघटना करत आहेत. पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.