नवी दिल्ली - काँग्रेसच्या सरचिटनीस प्रियंका गांधी यांनी बेरोजगारीच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. दुसऱ्या देशात जाऊन सगळं काही चांगलं असल्याचे सांगितल्याने परिस्थिती सुधारत नाही, असे प्रियंका गांधींनी म्हटले आहे.

विदेशात जाऊन भारतामध्ये सर्व काही चांगल सुरू आहे, असे सांगितल्याने सर्व ठीक होऊ शकत नाही . कोणत्याच क्षेत्रामधून नवीन रोजगार निर्माण झाल्याची किंवा वाढल्याची बातमी येत नाहीये. प्रसिद्ध कंपन्या लोकांना कामावरून कमी करत आहेत. या सर्वांवर नेहमी 'चंगा सी' ( सर्व काही चांगले आहे) बोलणारे का शांत आहेत, असे प्रियंका गांधींनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यावर गेले होते. ह्यूस्टन येथे ‘टेक्सास इंडिया फोरम’ कडून ऐतिहासिक ‘हाउडी मोदी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोदींनी लोकांना संबोधित केले होते. तेव्हा भारतामध्ये 'सब चंगा सी' ( सर्व काही चांगले आहे) असल्याचे त्यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटले होते.