नवी दिल्ली - आठ पोलिसांच्या हत्येस जबाबदार असलेल्या कुख्यात गुंड विकास दुबेवरील खटल्याची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केली आहे. कानपूरमध्ये पोलीस विकास दुबेला अटक करण्यास गेले असता त्याने साथीदारांसह पोलिसांवर गोळीबार केला होता. यामध्ये आठ पोलीस मारले गेले तर सात जण जखमी झाले. दुबेला मध्यप्रदेशातील उज्जैन येथून अटक करण्यात आली आहे.
-
कानपुर के जघन्य हत्याकांड में यूपी सरकार को जिस मुस्तैदी से काम करना चाहिए था, वह पूरी तरह फेल साबित हुई।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
अलर्ट के बावजूद आरोपी का उज्जैन तक पहुंचना, न सिर्फ सुरक्षा के दावों की पोल खोलता है बल्कि मिलीभगत की ओर इशारा करता है...1/2
">कानपुर के जघन्य हत्याकांड में यूपी सरकार को जिस मुस्तैदी से काम करना चाहिए था, वह पूरी तरह फेल साबित हुई।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 9, 2020
अलर्ट के बावजूद आरोपी का उज्जैन तक पहुंचना, न सिर्फ सुरक्षा के दावों की पोल खोलता है बल्कि मिलीभगत की ओर इशारा करता है...1/2कानपुर के जघन्य हत्याकांड में यूपी सरकार को जिस मुस्तैदी से काम करना चाहिए था, वह पूरी तरह फेल साबित हुई।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 9, 2020
अलर्ट के बावजूद आरोपी का उज्जैन तक पहुंचना, न सिर्फ सुरक्षा के दावों की पोल खोलता है बल्कि मिलीभगत की ओर इशारा करता है...1/2
‘विकास दुबे आणि सत्ताधाऱ्यांमधील संबध उघडे पाडण्यासाठी या प्रकरणाची सीबीआय चौकशी गरजेची आहे. कानपूरमधील पोलिसांच्या क्रुर हत्येनंतर ज्या पद्धीतीने पोलिसांनी हालचाल केली त्यातून सरकारचे अपयश दिसून येते. पोलिसांनी ’हायअलर्ट' दिला असतानाही विकास दुबे उज्जैनला पोहचला. त्यातून सुरक्षा यंत्रणांचा हलगर्जीपणा दिसून येतो'.
'तीन महिन्यांपूर्वी सरकारकडे आलेल्या पत्रावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तसेच विकास दुबेचे नाव अट्टल गुन्हेगारांच्या यादीतही नाही, यातून त्याचे संबंध फार वरतीपर्यंत असल्याचे दिसून येते. त्यामुळे सरकारने सीबीआय चौकशी करावी असे', प्रियांका गांधींनी ट्विटरवर म्हटले आहे.
पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर विकास दुबे फरार झाला होता. आठ दिवस पोलीस त्याच्या मागावर होते. शेवटी उज्जैनमधून त्याला अटक करण्यात आले आहे. त्याचे तीन साथीदारही पोलीस चकमकीत ठार झाले आहेत. तर इतर साथीदारांना ताब्यात घेण्यात येत आहे. मध्यप्रदेशातील उज्जैन येथील मंदिरातून त्याला अटक करण्यात आले. विकास दुबेच्या अटकेचे श्रेय मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी घेण्याचा प्रयत्न केला.