ETV Bharat / bharat

सोनभद्र हत्याकांडातील पीडितांना काँग्रेसकडून १० लाखांची मदत - प्रियांका गांधी

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी चुनार येथील विश्रामगृहात सोनभद्र हत्याकांडातील पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पीडिताच्या कुटुंबीयांना काँग्रेस पक्ष १० लाख रुपयांची मदत देणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे.

author img

By

Published : Jul 20, 2019, 3:48 PM IST

प्रियांका गांधी

मिर्जापूर - सोनभद्र हत्याकांडातील पीडितांची भेट घेण्यासाठी निघालेल्या उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, पीडितांची भेट घेतल्याशिवाय माघारी जाणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. यानंतर, पीडितांच्या कुटुंबीयाची आणि प्रियांका गांधींची भेट झाली आहे. प्रियांका गांधी यांनी काँग्रेस पक्षाकडून पीडित कुटुंबीयांना १० लाखाची मदत जाहीर केली आहे.

  • #WATCH: Priyanka Gandhi Vadra met the family members of the victims of Sonbhadra firing incident that claimed lives of 10 people, in Chunar. pic.twitter.com/RhiLijLbm6

    — ANI UP (@ANINewsUP) July 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी चुनार येथील विश्रामगृहात सोनभद्र हत्याकांडातील पीडिय कुटुंबीयांची भेट घेतली. प्रियांका गांधी म्हणाल्या, माझा मुळ उद्देश हा सोनभद्र हत्याकांडातील पीडित कुटुंबीयांना भेटण्याचा होता. परंतु, मला पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आले. घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पीडिताच्या कुटुंबीयांना काँग्रेस पक्ष १० लाख रुपयांची मदत देणार आहे.

प्रियांका गांधींना सोनभद्र हत्याकांडातील पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सोडून देण्यात आले. जिल्हा प्रशासनाने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, आम्ही प्रियांकांना अटक केली नव्हती. त्यामुळे त्या चुनार येथील विश्रामगृहातून जाऊ शकतात.

काय आहे प्रकरण?

१७ जुलै रोजी सोनभद्र जिल्ह्यातील उभ्भा गावामध्ये जमिनीवरून २ गटांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर झालेल्या गोळीबारामध्ये १० जणांचा मृत्यू झाला होता, तर १९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. या हत्याकांडानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.