ETV Bharat / bharat

कौतुकास्पद! वाराणसीत कैद्यांनी बनवले नैसर्गिक सॅनिटायझरसह मास्क

जिल्ह्याच्या तुरुंगात १ हजार ८०० हून अधिक कैदी आहेत. छोट्या गुन्ह्यांपासून तर हत्या आणि इतर मोठ-मोठ्या गुन्ह्यांमध्ये हात असलेले आरोपी याठिकाणी आहेत. हे सर्व आपला भूतकाळ विसरुन जेलमधील आपल्या सहकाऱ्यांच्या बचावासाठी तीन लेयर असलेले मास्क आणि सॅनिटायझर तयार करत आहेत.

कैद्यांनी बनवले नैसर्गिक सॅनिटायझरसह मास्क

author img

By

Published : Apr 22, 2020, 11:32 AM IST

वाराणसी - जिल्ह्यात कोरोनापासून बचावासाठी नागरिकांना सर्वात जास्त गरज सॅनिटायझर आणि मास्कची आहे. मात्र, सध्या बाजारात या दोन्ही वस्तूंचा तुटवडा आहे. ज्यामुळे प्रत्येकजण या वस्तू खरेदी करु शकत नाही. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांकडून या वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, वाराणसीमध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळाले. इथे हत्या, चोरी आणि इतर गुन्ह्यांमधील गुन्हेगार नैसर्गिक गोष्टींचा वापर करत स्वतः सॅनिटायझर बनवत आहेत.

जिल्ह्याच्या तुरुंगात १ हजार ८०० हून अधिक कैदी आहेत. छोट्या गुन्ह्यांपासून तर हत्या आणि इतर मोठ मोठ्या गुन्ह्यांमध्ये हात असलेले आरोपी याठिकाणी आहेत. हे सर्व आपला भूतकाळ विसरुन जेलमधील आपल्या सहकाऱ्यांच्या बचावासाठी तीन लेयर असलेले मास्क आणि सॅनिटायझर तयार करत आहेत.

नैसर्गिक सॅनिटायझर - जेलमध्ये बनवले जाणारे हे सॅनिटायझर नैसर्गिक आहे. परिसरातील लिंबाच्या पानांचा वापर करत, ही पाने बागेतील फुले, कोरपड आणि इतर औषधी पानांसोबत पाण्यात उकळून घेतली जात आहेत. यानंतर त्यात स्प्रिट मिसळून सॅनिटायझर बनवले जात आहे. तुरुंगासोबतच बाहेरील गरजूंनाही याचा पुरवठा करण्याची तयारी तुरुंग प्रशासनाकडून सुरू आहे.

या जिल्हा जेलचे जेलर बी. बी. पांडे यांनी सांगितले, की आमचा प्रयत्न आहे, की या महामारीदरम्यान कैदी स्वतःला सुरक्षित ठेवतील. यासोबतच इथे तयार होणारे मास्क आणि सॅनिटायझर बाहेरील गरजूंनाही वितरीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरुन प्रत्येक नागरिक सुरक्षित राहिल, असेही ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.