ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदींची डोंगरी दुर्घटनेबद्दल प्रतिक्रिया; म्हणाले... - मृत्यू

डोंगरी दुर्घटनेत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, १३ जणांचा मृत्यू आणि ७ जण जखमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी
author img

By

Published : Jul 16, 2019, 5:57 PM IST

मुंबई - शहरातील डोंगरी भागात ४ मजली इमारत कोसळली आहे. यामध्ये आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, १३ जणांचा मृत्यू आणि ७ जण जखमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या दुर्घनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुख: व्यक्त करताना मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे.

मोदींनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की डोंगरी येथे ४ मजली इमारत कोसळल्याची दुर्घटनेमुळे दुख: झाले आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमींच्या कुटुंबीयांसोबत माझी सहानुभूती आहे. मी आशा करतो, की जखमी लवकरात लवकर बरे व्हावे. महाराष्ट्र सरकार, एनडीआरएफ आणि स्थानिक संस्था बचावकार्य करत आहेत आणि गरजूंना मदत करत आहेत.

मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, स्थानिक नागरिक बचावकार्यात काम करत आहेत. तसेच परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. अरुंद गल्ली असल्याने या ठिकाणी मदतकार्यात अडथळे येत आहेत. या इमारतीला २०१७ मध्ये अतिधोकादायक इमारत म्हणून नोटीस देण्यात आली होती. मात्र, येथील रहिवाशांना राहण्यासाठी दुसरी जागा नसल्याने ते येथेच जीव मुठीत धरून राहत होते आणि आज त्यांच्यावर काळाने घाला घातला.

राजकीय नेते आणि अनेक मंत्री भेट देत असल्यामुळे दुर्घटनास्थळावर बचावकार्य करणाऱ्या यंत्रणेवर ताण येत आहे. दुर्घटनाग्रस्त इमारती शेजारील इमारतींनाही तडे गेल्याने तेथील रहिवाशांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.