ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदी भूतान दौऱ्यावर, 5 सामंजस्य करारांवर सह्या

author img

By

Published : Aug 17, 2019, 6:35 PM IST

Updated : Aug 17, 2019, 7:21 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय भूतान दौऱ्यावर गेले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या भूतान दौऱ्यावर गेले आहेत.

थिंफू - पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय भूतान दौऱ्यावर आहेत. आज शनिवारी भूतानचे पंतप्रधान लोते तेशरिंग यांनी मोदींचे पारो आंतराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले. यावेळी मोदींना 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला आहे. दोन्ही देशांमध्ये 5 एमओयूवर (सामंजस्य करार) सह्या झाल्या आहेत.

  • Bhutan: 5 Memoranda of Understanding (MoU) signed between India & Bhutan at Simtokha Dzong, in presence of Prime Minister Narendra Modi and Prime Minister of Bhutan (Dr.) Lotay Tshering pic.twitter.com/sRJIjb6h8H

    — ANI (@ANI) August 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भूतान देश भारताचा शेजारी आहे ही सौभाग्याची बाब आहे. दोन्ही देश सोबत पुढे जाऊ. भारतीयांच्या हृदयात भूतानचे विशेष स्थान आहे. माझा दुसऱ्या कार्यकाळात मी भूतानमध्ये आलो आहे. याबद्दल मला खूप आनंद आहे. मी आज भूतानमध्ये रुपे कार्ड सुरू केले. त्याची व्यवसायासाठी मदत होईल आणि आमच्या भागिदारीचा वारसाही बळकट होईल, असे मोदी म्हणाले.

2014 मध्ये जेव्हा मोदींनी भूतानचा दौरा केला होता. मला लक्षात आहे त्यावेळी ते म्हणाले की, आपल्या सीमा खुल्या आहेत. म्हणून नाही तर एकमेकांबद्दल आपले अंतःकरण खुले आहे, म्हणून भूतान आणि भारतामध्ये जवळचे संबंध आहेत, असे भूतानचे पंतप्रधान लोते तेशरिंग म्हणाले.

  • Bhutan PM (Dr.) Lotay Tshering: On his (PM Modi) first visit to Bhutan in 2014, I remember him saying that Bhutan & India are close not because we have open borders, but because we have opened our hearts to each other. Your visit this time shows how much you meant it pic.twitter.com/6i5pXgdCSQ

भूतानचे पंतप्रधान लोते तेशरिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन्ही देशांमधील राष्ट्रीय ज्ञानाचे नेटवर्क म्हणून काम करणाऱ्या ई-प्लेकचे अनावरण करण्यात आले आहे.

शेजारील राष्ट्रांना प्राधान्य या भारताच्या नितीनुसार भूतानसोबत भारताचे मैत्रीसंबध महत्त्वाचे आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये दोघांमधील संबध आणखी घट्ट होतील, असे भारताने निवेदनामध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींची ही दुसरी भूतान भेट आहे. यावेळी हजारो महिला, मुलांनी हातात तिरंगा घेत रस्त्याच्या कडेला उभे राहून मोदींचे स्वागत केले. याआधी भाजप सरकारच्या पहिल्या कार्यकाळामध्ये त्यांनी भूतानला भेट दिली होती.

Intro:Body:

mayu

Conclusion:
Last Updated : Aug 17, 2019, 7:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.