ETV Bharat / bharat

CORONA : 7 महिन्याच्या गर्भवती महिलेची १० दिवस पायपीट; सुरत ते भरतपूर केला पायी प्रवास - pregnant woman news

लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत कामगार आपल्या गावी परतत आहेत. एक 7 महिन्याची गर्भवती महिला तब्बल 10 दिवस पायी चालत गुजरातमधील सुरत येथून भरतपूर सीमेवर पोहचली आहे.

pregnant woman
pregnant woman
author img

By

Published : May 22, 2020, 10:23 AM IST

नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत कामगार आपल्या गावी परतत आहेत. एक 7 महिन्याची गर्भवती महिला तब्बल 10 दिवस पायी चालत गुजरातमधील सुरत येथून भरतपूर सीमेवर पोहोचली आहे.

सोनेंद्री देवी असे महिलेचे नाव असून तिला 7 वा महिना सुरू आहे. आपल्या गावी पोहोचण्यासाठी कुटुंबीयासोबत महिलेने 10 दिवस पायी प्रवास केला आहे. उत्तर प्रदेशच्या कासगंजमधील हे प्रवासी कामगार बुधवारी भरतपूर सीमेवर पोहोचले.

7 महिन्याच्या गर्भवती महिलेचा हजारो किलोमीटरचा पायी प्रवास

लॉकडाऊन दरम्यान राज्य सरकार रेल्वे आणि बसेसने स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या राज्यात सोडत आहेत. तर काही कामगार पायीच आपल्या घराच्या दिशेने निघालेले पाहायला मिळत आहेत. लॉकडाऊन दरम्यान गर्भवती महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक गर्भवती स्थलांतरीत महिलाची प्रवासादरम्यान बसेस, रेल्वे, स्थानकावरच प्रसुती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान देशभरात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व राज्यांना 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचे निर्देश दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.