हैदराबाद- माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सहभाग घेतला.तेलंगणा प्रदेश काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पी.चिदंबरम आणि जयराम रमेश यांनी सहभाग घेतला. मुख्य कार्यक्रमाचे आयोजन दिल्लीतील गांधी भवन येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे सोशल मीडियावरुन प्रसारण करण्यात आले होते.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी या कार्यक्रमात संदेशाद्वारे सहभाग घेतला. नरसिंह राव यांनी दिर्घ काळ राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात काम केले. ते पंतप्रधान झाले आणि त्यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले. 24 जुलै 1991 रोजी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाने देशात आर्थिक बदलांचा पाया घातला. त्याच्या काळात अनेक राजकीय, सामाजिक आणि परराष्ट्र धोरणात यश मिळवले. यासोबतच नरसिंह राव काँग्रेसचे सदस्य होते आणि त्यांनी पक्षासाठी महत्वाचे योगदान दिले.
आधुनिक भारताला आकार देण्यात नरसिंह राव यांचे योगदान आहे. लहानपणी काँग्रेसमध्ये ते सहभागी झाले आणि सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान झाले. 24 जुलैच्या दिवशी त्यांनी देशात आर्थिक बदलांसाठीचा पाया रचला. नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावली,असे राहुल गांधी यांनी म्हटले.
अशक्य गोष्टी करुन दाखवण्यासाठी नरसिंहराव प्रसिद्ध होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जमीन सुधारणांमध्ये मोलाचे काम केले, असे प्रणव मुखर्जी यांनी म्हटले. 24 जुलै रोजी कार्यक्रम आयोजित केल्याचा आनंद होत असल्याचे मनमोहन सिंग यांनी सांगितले. आर्थिक सुधारणांचा निर्णय घेतल्याचे त्यांना आनंद झाला होता, असेही त्यांनी सांगितले.
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम, जयराम रमेश यांनी तेलंगणा प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नरसिंहराव यांच्या आठवणींना उजाळा दिला.