ETV Bharat / bharat

'लेखक-प्रकाशकाने पुस्तक मागे घेतले'... जावडेकरांची सारवासारव - BJP on aaj ke shivaji

गेल्या दोन दिवसांपासून 'आज के शिवाजी: नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून प्रचंड गदारोळ सुरू आहे. महाराष्ट्रासह देशभरातून याविरोधात तीव्र प्रतिक्रिया येत असल्याने भाजपने यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

prakash javadekar news
'आजके शिवाजी: नरेंद्र मोदी' या पुस्तकाशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले आहे.
author img

By

Published : Jan 14, 2020, 2:16 AM IST

Updated : Jan 14, 2020, 8:12 AM IST

नवी दिल्ली - छत्रपती शिवाजी महाराज हे महान शासक होते, त्यांची कोणाशाही तुलना करणे चुकीचे आहे, तसेच 'आजके शिवाजी: नरेंद्र मोदी' या पुस्तकाशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले आहे.

मागील दोन दिवसांपासून जय भगवान गोयल लिखीत 'आज के शिवाजी: नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून गदारोळ सुरू आहे. यावर बोलताना, लेखक व प्रकाशकाने संबंधित पुस्तक मागे घेतल्याचे जावडेकर यांनी सांगितले. तसेच यामुळे शिवाजी महाराजांचा वारसा अबाधित राहणार असल्याचे ते म्हणाले.

'आजके शिवाजी: नरेंद्र मोदी' या पुस्तकाशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले आहे.

हेही वाचा - 'CAA बाबत टीव्हीवर ५ टीकाकारांच्या प्रश्नांना उत्तरे द्या, जनता काय तो निष्कर्ष काढेल'

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना, या पुस्तकाशी भाजपचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. तसेच शिवाजी महाराजांची कोणाशीही तुलना करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.

जगाभरातील शिवभक्तांच्या भावना दुखवल्याने लेखक जय भगवान गोयल माफी मागत असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे आता कोणत्याही प्रकारचा वाद-विवाद न करता, हे प्रकरण बंद केले पाहिजे, असे जावडेकर म्हणाले.

Intro:Body:

नवी दिल्ली - छत्रपती शिवाजी महाराज हे महान योद्धा असून त्यांची कोणाशाही तुलना करणे चुकीचे आहे. तसेच 'आजके शिवाजी: नरेंद्र मोदी' या पुस्तकाशी भाजपचा काहीही संबंध नाही. असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.

मागील दोन दिवसांपासून जय भगवान गोयल लिखीत 'आज के शिवाजी: नरेंद्र मोदी' या पुस्तकावरुन गदारोळ सुरु आहे. यामुळे शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रासह जगभरातील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान, आता दोन दिवसानंतर भाजपने आपली भुमिका स्पष्ट करत सावरासावर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, या पुस्तकाशी भाजपचा काहीही संबंध नाही. शिवाजी महाराज इतिहासातील  महान योद्धे असून त्यांची कोणासोबतही तुलना करणे चुकीचे आहे. तसेच स्वत: जय भगवान गोयल जगाभरातील शिवभक्तांच्या भावना दुखावल्याने माफी मागत आहेत. यामुळे आता यावर कोणत्याही प्रकारचा वाद विवाद न करता, हे प्रकरण बंद केले पाहिजे.

Conclusion:
Last Updated : Jan 14, 2020, 8:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.