ETV Bharat / bharat

राष्ट्रवादी पुन्हा..! सर्वात लहान लोकसभा मतदारसंघ असलेल्या लक्षद्वीपमध्ये मंहमद फैजल विजयी - सईद

राज्यात आघाडी केलेल्या NCP ने लक्षद्वीपमध्ये मात्र काँग्रेसला शह देत २०१४ मध्ये पहिल्यांदाच आपला झेंडा या बेटावर रोवला होता. त्यानंतर आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून एकूण ६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे प्रमुख पक्ष तर जनता दल, सीपीआईएम आणि सीपीआई या पक्षाचे उमेदवार रिंगणात होते.

लक्षद्वीपमध्ये मंहमद फैजल विजयी
author img

By

Published : May 23, 2019, 5:40 PM IST

लक्षद्वीप - एकेकाळ काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला आणि देशातली सर्वात लहान लोकसभा मतदारसंघ असलेल्या लक्षद्विपमध्ये काँग्रेस- राष्ट्रवादीमध्येच चुरशीची लढत झाली. या लढतीत राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार मंहमद फैजल पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. फैजल यांनी काँग्रेसचे उमेदवार मुहम्मद हमदुल्ला सईद यांचा पराभव करून आपले गड राखण्यात यश मिळवले आहे.

राष्ट्रवादीच्या फैजल यांना यावेळी एकूण २२ हजार ७९६ इतकी मते पडली. तर काँग्रेसचे उमेदवार सईद यांना २१ हजार ९८० एवढी मते मिळाली. तर भाजप उमेदवार अब्दूल हाजी यांना केवळ १०३ मते मिळाली.

केंद्र शासित प्रदेश असलेल्या लक्षद्वीप या लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला होता. यावेळी १७ व्या लोकसभेसाठी एकूण ६६ टक्के मतदान झाले होते. मागच्या वेळेप्रमाणे राष्ट्रवादीने यावेळीही या द्वीप समुहावर घड्याळ्याची टिकटिक कायम राखली आहे.

राज्यात आघाडी केलेल्या NCP ने लक्षद्वीपमध्ये मात्र काँग्रेसला शह देत २०१४ मध्ये पहिल्यांदाच आपला झेंडा या बेटावर रोवला होता. त्यानंतर आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून एकूण ६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे प्रमुख पक्ष तर जनता दल, सीपीआईएम आणि सीपीआई या पक्षाचे उमेदवार रिंगणात होते.

राष्ट्रवादीने विद्यमान खासदार मोहम्मद फैजल यांना पुन्हा संधी दिली होती. काँग्रेसनेही फैजल यांच्या विरोधात मुहम्मद हमदुल्ला सईद यांना रणांगणात उतरवले होते. तर केंद्रातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपने या ठिकाणी अद्बल खादेर यांना उमेदवारी जाहीर केली होती. भारतीय कम्युनिस्ट पार्टीकडून शरीफ खान, जनता दल (यूनाइटेड)चे मोहम्मद शादिक मैदानात होते. या मतदारसंघासाठी निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात म्हणजे ११ तारखेला मतदान पार पडले. यावेळी एकूण ५१ मतदान केंद्रांवर मतदान घेण्य़ात आले. त्यामध्ये एकूण ४६८७७ एवढे मतदान झाले होते.

Intro:Body:

PP Mohammed Faizal,  NCP , Lakshadweep, CONGRESS, LOKSABHA, POLL, RESULTS, भाजप, राष्ट्रवादी, मंहमद फैजल, सईद, मतमोजणी

राष्ट्रवादी पुन्हा..! सर्वात लहान लोकसभा मतदारसंघ लक्षद्वीपमध्ये मंहमद फैजल विजयी

लक्षद्वीप - एकेकाळ काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला आणि देशातली सर्वात लहान लोकसभा मतदारसंघ असलेल्या लक्षद्विपमध्ये काँग्रेस- राष्ट्रवादीमध्येच चुरशीची लढत झाली. या लढतीत राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार मंहमद फैजल पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. फैजल यांनी काँग्रेसचे उमेदवार मुहम्मद हमदुल्ला सईद यांचा पराभव करून आपले गड राखण्यात यश मिळवले आहे.

राष्ट्रवादीच्या फैजल यांना यावेळी एकूण २२ हजार ७९६ इतकी मते पडली. तर काँग्रेसचे उमेदवार सईद यांना २१ हजार ९८० एवढी मते मिळाली. तर भाजप उमेदवार अब्दूल हाजी यांना केवळ १०३ मते मिळाली.

केंद्र शासित प्रदेश असलेल्या लक्षद्वीप या लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला होता. यावेळी १७ व्या लोकसभेसाठी एकूण ६६ टक्के मतदान झाले होते. मागच्या वेळेप्रमाणे राष्ट्रवादीने यावेळीही या द्वीप समुहावर घड्याळ्याची टिकटिक कायम राखली आहे.

राज्यात आघाडी केलेल्या NCP ने लक्षद्वीपमध्ये मात्र काँग्रेसला शह देत २०१४ मध्ये पहिल्यांदाच आपला झेंडा या बेटावर रोवला होता. त्यानंतर आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून एकूण ६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे प्रमुख पक्ष तर जनता दल, सीपीआईएम आणि सीपीआई या पक्षाचे उमेदवार रिंगणात होते.

राष्ट्रवादीने विद्यमान खासदार मोहम्मद फैजल यांना पुन्हा संधी दिली होती. काँग्रेसनेही फैजल यांच्या विरोधात मुहम्मद हमदुल्ला सईद यांना रणांगणात उतरवले होते. तर केंद्रातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपने या ठिकाणी अद्बल खादेर यांना उमेदवारी जाहीर केली होती. भारतीय कम्युनिस्ट पार्टीकडून शरीफ खान, जनता दल (यूनाइटेड)चे मोहम्मद शादिक मैदानात होते. या मतदारसंघासाठी निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात म्हणजे ११ तारखेला मतदान पार पडले. यावेळी एकूण ५१ मतदान केंद्रांवर मतदान घेण्य़ात आले. त्यामध्ये एकूण ४६८७७ एवढे मतदान झाले होते.

लक्षद्वीप लोकसभा मतदारसंघाची राजकीय पार्श्वभूमी-

लक्षद्वीप लोकसभा मतदारसंघात पहल्यांदा १९६७ मध्ये निवडणूक झाली. यापूर्वी राष्ट्रपतीकडूनच येथील लोकसभा सदस्याची नियुक्त करण्यात येत होती. पहिल्यादा काँग्रेसचे के के. नल्ला कोया थनगल हे येथून खासदार झाले होते. त्यानंतर १९६७ला पहिल्यांदाच खासदारकीसाठी मतदान झाले. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार पदनाथ मोहम्मद सईद हे विजयी झाले होते. १९७१ च्या निवडणुकीतही सईद यांचाच विजय झाला. यावेळी ते काँग्रेसच्या तिकीटावर खासदार झाले होते.

१९६७ पासून २००४ पर्यंत सईद यांनी या ठिकाणांवरून १० वेळा विजयाचा वारू उधळताच ठेवला. त्या जोरावर त्यांनी केंद्रीय मंत्री पदही भुषवले. त्यानंतर २००४ च्या निवडणुकीत जनता दल युनाइटेडच्या पी. पूकुन्ही कोया यांनी सईद यांच्या विजयाचा वारूला लगाम घातला आणि कोया खासदार म्हणून संसंदेत गेले. मात्र, २००९च्या लोकसभा निवडणुकीत सईदचा मुलगा मुहम्मद हमदुल्ला सईद यांनी विजय मिळवला. त्यानंतर मात्र, २०१४ मध्ये राष्ट्रवादीने घड्याळाचे काटे फिरवून पी.पी मोहम्मद फैजल यांना खासदार केले.

लक्षद्वीप या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा दबदबा आहे. या शिवाय भाजप, सीपीआईएम आणि सीपीआई यासारख्या पक्षांचे नाममात्र अस्तित्व राहिले आहे. येथील निवडणुकीच्या इतिहासावर नजर टाकली असता, काँग्रेसचे माजी खासदार पदनाथ मोहम्मद सईद यांचा एकछत्री अंमल असल्याचे दिसून येते. जनतेने त्यांनाच वारंवार निवडून दिले आहे. त्यानंतर त्यांच्या मुलालाही संधी दिल्याचे दिसून येते.

मतांचे विभाजन-

लक्षद्वीप लोकसभा सीट अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या एकूण ६४ हजार ४२९ इतकी आहे. मत्स्यपालन आणि पर्यटन हे येथील उपजिविकेचे महत्वाचे साधन आहे. या मतदारसंघात एकूण ४९ हजार ९२२ मतदान आहे. त्यामध्ये २१ हजार ५८४ पुरुष तर २१ हजार ६५५ महिला मतदार आहेत.

लक्षद्वीप समूहाची भौगोलिक रचना -

भारताच्या दक्षिण-पश्चिम दिशेला अरबी समुद्रामध्ये हे बेट आहे. ३६ द्वीप समुह असलेल्या या बेटावरील ७ द्वीपावरच जनतेचा अधिवास आहे. यात ६ बेटांवर भारतीयांना आणि २ बेटांवर परदेशी नागरिकांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. लक्षद्वीप हे भारतचे सर्वात लहान केंद्र शासित प्रदेश म्हणून ओळखले जाते. ३२ चौरस किली एवढे या बेटाचे क्षेत्रफळ आहे. कवरत्ती हे शहर या बेटाची राजधानी आहे. लक्षद्वीप समूहामध्ये कठमठ, मिनीकॉय, कवरत्ती, बंगाराम, कल्पेनी, अगाती आणि अंदरोत हे प्रमुख द्वीप आहेत.

लक्षद्वीप या केंद्र शासित प्रदेशाचे नियंत्रण केंद्र सरकारच्या नेतृत्वात राज्यपालाकडून केले जाते. लक्षद्वीपची स्थापना एक नोव्हेंबर १९५६ ला झाली. १९७३ मध्ये ३६ बेटांच्या या समूहाचे लक्षद्वीप समूह असे नामकरण करण्यात आले. सध्या राज्यपाल फारूख खान हे याच्या देखरेखीखाली येथील प्रशासनाचा गाडा हाकला जातो. फारूक खान हे माजी सनदी अधिकारी असून ते मुळचे जम्मू काश्मीरचे आहेत

२०१४ लोकसभा निवडणुकीतील जनमत-

लक्षद्वीप मतदारसंघातून २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पी.पी मोहम्मद फैजल विजयी झाले होते. त्यांनी २१ हजार ६६५ मते मिळवली होती. त्यांना एकूण ५०.११ टक्के मते मिळाली होती. वहीं, फैजल के सबसे करीबी प्रतिद्वंदी कांग्रेस पार्टी के मुहम्मद हमदुल्ला सईद यांना २० हजार १३० मते मिळाली होती. म्हणजेच सईद यांना ४६.५६ मतदान मिळाले होते. या निवडणुकीत एकूण ४३ हजार २४२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. म्हणजेच एकूण ८६. ६२ टक्के मतदान झाले होते.

फैजल यांच्या विषयी-

लक्षद्वीपचे खासदार ४३ वर्षीय पीपी मोहम्मद फैजल हे एक उद्योजक आहेत. फैजल यांनी कालीकट विद्यापीठातून एमबीएची पदवी मिळवली आहे. लक्षद्वीपच्या अन्द्रोत मध्ये २८ मे १९७५ ला त्यांचा जन्म झाला. तर १९ सप्टेबर २००२ मध्ये रहमत बेगम यांच्याशी विवाह झाला. त्यांना एक मुलगा आणि ३ मुली आहेत.

फैजल यांनी १६ व्या लोकसभेत एकूण ३३१ दिवसांमध्ये २५० दिवस उपस्थिती लावली. या कालावधती त्यांनी एकूण ३५५ प्रश्न उपस्थित केले होते. तर ४८ चर्चेच्या मुद्य्यामध्ये भाग घेतला. मात्र, खासदार निधीचा खर्च करण्यात ते मागे पडले आहेत. त्यांनी केवळ १६ कोटी ४४ लाखांची विकासकामे केली आहेत. जोकी २५ कोटी विकास निधी खर्च करता येऊ शकतो.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.