इंदूर - बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता, राजकीय घडामोंडीना वेग आला आहे. भाजपा सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या नेतृत्वात स्वतंत्र आणि निष्पक्ष 2021 च्या विधानसभा निवडणुका होऊ शकणार नाहीत, असे म्हणाले. याचबरोबर महाराष्ट्र सरकारविरोधात जनतेत रोष असल्याचे ते म्हणाले.
राज्यात राष्ट्रपतीचा शासन लागू केल्यास किंवा सध्याच्या स्थानिक प्रशासनाच्या अनुपस्थितीतच स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुका घेता येतील. भारत हा सर्वात मोठा लोकशाही देश आहे. लोकशाहीमध्ये हिंसाचाराला कोणतेही स्थान नाही. आम्ही निवडणूक प्रक्रियेतून हिंसक कार्यात सहभागी लोकांना पराभूत करू शकतो. आगामी विधानसभा निवडणुकीत बंगालमधील लोक या हिंसक राजकारणाविरूद्ध उभे राहतील, असे कैलास विजयवर्गीय म्हणाले.
कैलास विजयवर्गीय यांनी महाराष्ट्रातील सरकारवर भाष्य केले. तिथे भाजपचे सरकार स्थापन करण्यावर आता भाष्य करणे योग्य नाही. तेथील सरकार ज्या पद्धतीने कार्य करीत आहे. त्यामुळे राकारविरुद्ध जनतेत रोष आहे. भविष्यात काय होईल, हे सांगू शकत नाही, असेही ते म्हणाले.
एप्रिलमध्ये विधानसभा निवडणुका -
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांना अजून अवधी असतानाच भारतीय जनता पक्षाने निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. राज्यात आगामी वर्षात एप्रिल महिन्यात विधानसभा निवडणुका होऊ शकतात. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भाजपकडून तगडं आव्हान उभं करण्यात येत आहे.
भाजपाचे ध्येय -
अमित शहा यांनी मिशन बंगालचे लक्ष्य निश्चित केले. गृहमंत्री अमित शहा यांच्या बंगाल दौर्यानेही राजकीय वातावरण तापले आहे. ममता बॅनर्जीही यावेळी भाजपाला गांभीर्याने घेत आहेत. कारण, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांनी बंगालमधील 42 पैकी 22 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. निकालात भाजपाने 18 जागा जिंकल्या होत्या. तर टीएमसीला 22 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या. अशा परिस्थितीत 2021 च्या विधानसभा निवडणुकीत बंगालमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - सीमेवर तैनात सुरक्षा दलाच्या जवानांची उत्साहात दिवाळी