ETV Bharat / bharat

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर

author img

By

Published : Nov 25, 2020, 8:17 AM IST

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि सोनिया गांधींचे माजी सल्लागार अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. त्यांना ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान बुधवारी (दि. 25 नोव्हेंबर) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या कारकिर्दीवर एक नजर...

political-career-of-congress-leader-ahmed-patel
अहमद पटेल

हैदराबाद : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. त्यांचा मुलगा फैजल पटेल याने ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एक ऑक्टोबरपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांची तब्येत खालावल्याने आज त्यांची प्राणज्योत मालवली.

राजकीय कारकीर्द..

८ वेळा केले गुजरातचे प्रतिनिधीत्व

अहमद पटेल यांचा जन्म २१ ऑगस्ट १९४९ रोजी गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वर तालुक्यातील पिरामण गावात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव मोहम्मद ईशकची पटेल आणि आईचे नाव हवाबेन मोहम्मद होते. वडील काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे अहमद पटेल राजकारणात आले, असे सांगितले जाते.

सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार -

अहमद पटेल काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते. तसेच ते राज्यसभा खासदार होते. अहमद पटेल २००१ पासून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार होते. ते गांधी आणि नेहरू कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे नेते होते.

१९७६ पासून राजकीय जीवनाची सुरुवात -

१९७६ मध्ये अहमद पटेल यांचे लग्न मेमूना अहमद यांच्यासोबत झाले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अहमद पटेल यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात १९७६ मध्ये भरुच नगरपालिकेच्या निवडणुकीतून केली होती. त्यानंतर ते पंचायत अध्यक्ष झाले आणि नंतर ते काँग्रेससोबत जोडले गेले. अहमद पटेल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. आणीबाणीच्या काळात १९७७ मध्ये लोकसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा विजयी झाले होते.

तीन वेळा लोकसभा आणि पाच वेळा राज्यसभा सदस्य -

अहमद पटेल यांनी आठवेळा गुजरातमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. १९७७, १९८० आणि १९८४ मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले. तर, १९९३, १९९९, २००५, २०११ आणि २०१७ मध्ये ते राज्यसभेवर गेले. सध्या ते राज्यसभा सदस्य होते. ९ ऑगस्ट २०१७ मध्ये राज्यसभेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीत ते भाजप उमेदवार बळवंतसिंह राजपूत यांना पराभूत करून निवडणूक जिंकले. २१ ऑगस्ट २०१८ मध्ये राहुल गांधी यांनी अहमद पटेल यांची ऑल इंडिया काँग्रेस पक्षाच्या खजिनदारपदी नेमणूक केली. २००४ आणि २००९च्या निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाचे श्रेय अहमद पटेल यांना जाते. अहमद पटेल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांचे खूप विश्वासू होते.

ट्विट करून दिली होती कोरोना झाल्याची माहिती -

अहमद पटेल यांनी १ ऑक्टोबरला त्यांना कोरोना झाल्याची माहिती ट्विट करून दिली होती. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं होतं की, मला कोरोना झाला असून जे लोक माझ्या संपर्कात आले होते, त्यांनी विलगीकरणात राहावे, असे आवाहन त्यांनी केले होते.

हेही वाचा -काँग्रेस नेते अहमद पटेलांचे निधन; नेत्यांनी व्यक्त केला शोक..

हेही वाचा -काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे कोरोनाने निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.