कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये कोलकाता शहरात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. हे विद्यार्थी जाधवपूर विद्यापीठाचे आहेत. शहरातील सुलेखा मोर परिसरात हे विद्यार्थी जेएनयू हिंसाचाराच्या निषेधार्थ आंदोलन करत होते.
-
#WATCH West Bengal: Police lathicharge on Jadavpur University students, near Sulekha Mor in Kolkata, during protest against JNU violence. pic.twitter.com/mJKV2D3gXF
— ANI (@ANI) January 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH West Bengal: Police lathicharge on Jadavpur University students, near Sulekha Mor in Kolkata, during protest against JNU violence. pic.twitter.com/mJKV2D3gXF
— ANI (@ANI) January 6, 2020#WATCH West Bengal: Police lathicharge on Jadavpur University students, near Sulekha Mor in Kolkata, during protest against JNU violence. pic.twitter.com/mJKV2D3gXF
— ANI (@ANI) January 6, 2020
हेही वाचा - जेएनयू हिंसाचाराविरोधात मुंबईत विद्यार्थ्यांचे आंदोलन, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी काही विद्यार्थी आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याचेही पाहायला मिळाले. दरम्यान, 'आम्ही भाजप कार्यकर्त्यांचा पाठलाग करत असताना जाधवपूर विद्यापीठाच्या काही विद्यार्थ्यांनी जमावात प्रवेश केला. टायर पेटविणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांमधून आम्ही विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना वेगळे करू शकलो नाही. आम्ही जाधवपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला नाही' असे पोलीस उपायुक्त सुदीप सरकार यांनी स्पष्ट केले आहे.