नवी दिल्ली - बहुप्रतीक्षित करतारपूर कॉरिडॉरचे भारताच्या बाजूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ८ नोव्हेंबरला होणार आहे. केंद्रीय मंत्री हरसिम्रत कौर यांनी ट्विट करत ही माहिती दिली. याआधी हरसिम्रत यांनी करतारपूर कॉरिडॉरचे बांधकाम आणि नूतनीकरण ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल, असे म्हटले होते.
-
Eternally Grateful to Guru Sahab for enabling Modi ji to correct the wrong committed by @INCIndia 72 yrs ago & connecting us to the abode of our Guru. 2/2#kartarpurcorridor
— Harsimrat Kaur Badal (@HarsimratBadal_) October 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Eternally Grateful to Guru Sahab for enabling Modi ji to correct the wrong committed by @INCIndia 72 yrs ago & connecting us to the abode of our Guru. 2/2#kartarpurcorridor
— Harsimrat Kaur Badal (@HarsimratBadal_) October 12, 2019Eternally Grateful to Guru Sahab for enabling Modi ji to correct the wrong committed by @INCIndia 72 yrs ago & connecting us to the abode of our Guru. 2/2#kartarpurcorridor
— Harsimrat Kaur Badal (@HarsimratBadal_) October 12, 2019
शीख धर्मसंस्थापक गुरु नानक देव यांची १२ नोव्हेंबरला ५५० वी जयंती आहे. या दिवशी शीख भाविकांसाठी हा कॉरिडॉर खुला होणार आहे. करतारपूर कॉरिडॉरमुळे भारतीय शीख भाविकांना व्हिसाशिवाय पाकिस्तानातील करतारपूर साहिब गुरुद्वारा येथे जाता येणार आहे. भारत-पाक सीमेपासून पाकमध्ये हे ठिकाण ४ किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी गुरु नानक देव यांनी जीवनातील शेवटची १८ वर्षे वास्तव्य केले होते. हे ठिकाण पाकमधील नरोवाल जिल्ह्यात रावी नदीच्या काठी वसलेले आहे.
हेही वाचा - आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेतले जाणार नाही - केसीआर
नोव्हेंबर २०१८ मध्ये पाकिस्तान आणि भारताने या शीखांच्या पवित्र स्थानी भारतीय शीखांना येता यावे, यासाठी करतारपूर कॉरिडॉरला मंजुरी दिली होती. पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक येथून कॉरिडॉरची सुरुवात होते.
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मागील वर्षी २६ नोव्हेंबरला गुरदासपूर येथे या कॉरिडॉरची कोनशीला ठेवली होती. २ दिवसांनंतर पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी नरोवाल येथे कारिडॉरच्या पाकिस्तानतील बाजूला कोनशीलेचे उद्घाटन केले होते. हे ठिकाण लाहोरपासून साधारण १२५ किलोमीटरवर आहे.
हेही वाचा - संयुक्त राष्ट्राचे सर्व कर्ज भारताने फेडले; यादीत पाकिस्तान-चीनचा उल्लेखही नाही